एक्स्प्लोर
Advertisement
पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून नवे वेळापत्रक जाहीर
कोकण रेल्वेने ज्या कालावधीसाठी रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे, त्या कालावधीत गणेशोत्सव सुद्धा येतो आहे. त्यामुळे वेळापत्रकातील कोकणवासियांसाठी महत्त्वाचे आहे.
सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेने मान्सूनसाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. हे नवे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्टोबरसाठी लागू असेल. या कालावधीत रेल्वेची वेगमर्यादा 40 ते 90 प्रतितास असणार आहे. तसेच सर्वच धोकादायक ठिकाणी 24 तास गस्त असणार आहे.
कोकण रेल्वेने ज्या कालावधीसाठी रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे, त्या कालावधीत गणेशोत्सव सुद्धा येतो आहे. त्यामुळे वेळापत्रकातील कोकणवासियांसाठी महत्त्वाचे आहे.
कोकण रेल्वेचे मान्सून कालावधीतील (१० जून ते ३० ऑक्टोबर) वेळापत्रक :
- 10104 मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस मडगाव येथून - स.९.१५ ऐवजी स ८.३० वा. सुटेल
- 11004 सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्स्प्रेस सावंतवाड़ी येथून - सायं. ६.५० ऐवजी सायं. ५.३० वा. सुटेल
- 12052 मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस मडगाव येथून- दु. २.३० ऐवजी दु. १२ वा. सुटेल
- 12620 मंगळुरू-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस मंगळुरू येथून- दु. २.३५ ऐवजी दु. १२.५० वा. सुटेल
- 22907 मडगाव-हापा एक्स्प्रेस मडगाव येथून- स. १०.४०ऐवजी स. ७ वा. सुटेल
- 12741 वास्को-पाटणा एक्स्प्रेस वास्को द गामा येथून- सायं. ७.०५ऐवजी सायं. ६ वा. सुटेल
- 10215 मडगाव-एर्नाकुलम एक्स्प्रेस मडगाव येथून -रा. ९.३०ऐवजी रा. ९ वा. सुटेल
- 11086 मडगाव-एलटीटी डबलडेकर एक्स्प्रेस मडगाव येथून- स. ६ ऐवजी स. ५.३० वा. सुटेल
- 50101 मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर मडगांव येथून- सायं. ७.१० ऐवजी रा. ८ वा. सुटेल
- 50102 रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर रत्नागिरी येथून -पहाटे ३.२०ऐवजी पहाटे २.२० वा. सुटेल
- 50106 सावंतवाड़ी दिवा पॅसेंजर सावंतवाडी येथून- स. ८.३० ऐवजी ८.२५ वा सुटेल
- 12134 मंगळुरू जं.-सीएसटी एक्स्प्रेस मंगळुरू येथून- दु. २ ऐवजी दु. ४.४५ वा. सुटेल
- (गाडी संख्या उपलब्ध नाही) कारवार-बेंगळुरू एक्स्प्रेस दु. २.४०ऐवजी दु. २.५५ वा. सुटेल
- 56641 मडगाव-मंगळुरू पॅसेंजर मडगाव येथून- दु. १ ऐवजी २ वा. सुटेल
- 71096 अप रोहा दिवा पँसेजर रोहा येथून - दु.३.४० ऐवजी दु. ४ वाजता सुटेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement