एक्स्प्लोर

अनिल परब, धनजंय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; किरीट सोमय्यांचा घणाघात

Kirit Somaiya on Anil Parab : अनिल परब, धनजंय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; असा घणाघात किरीट सोमय्यांनी केला आहे.

Kirit Somaiya on Anil Parab : मंत्री अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. लोकायुक्त सुनावणीत आता हे सिद्ध झालं आहे की, ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांनी फसवणूक, फॉर्जरी करून रत्नागिरी दापोली येथील समुद्र तटावर 17800 स्क्वेअर फूटाचे पंच तारांकित रिसॉर्ट बांधलं असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. या आरोपानंतरच अनिल परबांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. या संदर्भात लोकायुक्त, राज्यपाल, राष्ट्रीय हरीत लवादा (National Green Tribunal), दापोली पोलीस स्टेशन, पर्यावरण मंत्रालय केंद्र सरकार अशा विभिन्न विभागात तक्रारी याचिका करण्यात आल्या होत्या. मग मग अनिल परब यांच्यावर कारवाई कधी होणार? असं 

भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "लोकायुक्त यांच्याकडे झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने अॅफिडेवीट सुपूर्द केले. त्यात अनिल परब यांच्या या रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द करण्यात आल्याचा उल्लेख आहे. दोन चौकशींमध्ये हे सुद्धा आढळून आलं की, नगर रचना विभागानं सदर जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही, असं स्पष्ट पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं होतं. ते पत्र अनिल परब यांचे मित्र सहकारी अधिकारी यांनी महसूल/ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाईलमधून गायब केले होते."

"अनिल परब यांनी फसवणूक, फॉर्जरी, लबाडी करून हा रिसॉर्ट बांधला. मंत्री असताना रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण केले आणि स्वतःच्या खात्यातून पैसे दिले. ठाकरे सरकार अनिल परब यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सोमवार दिनांक 13 डिसेंबर रोजी मी दापोली पोलीस स्टेशन येथे या तक्रारीचा पाठपुरावा आणि FIR दाखल करणार आहे. अनिल परब यांच्या फसवणूक, फोर्जरीच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी दापोली येथे जाणार आहेत.", असं किरीट सोमय्या म्हणाले. 

किरीट सोमय्यांनी पूर्ण ऑर्डर वाचली नाही : अनिल परब 

किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना, "माझं त्यात नाव नाही. सोमय्या यांनी पूर्ण ऑर्डर वाचली नाही. वाचली तर ज्याची ती मालकी आहे, त्यांच्यावर कारवाई करतील. किरीट सोमय्या यांच्यावर मी मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांना माफी मागावी लागेल किंवा 100 कोटी रुपये भरावे लागतील." , असं म्हणाले. 

धनजंय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; किरीट सोमय्या

"समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखानाच्या चौकशी संदर्भात बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, "समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखाना घोटाळ्याच्या विरोधात 14 जून 2019 रोजी बीड पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला होता. धनंजय मुंडे यांनी या एफआयआरच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि तात्पुरती स्थगिती मिळवली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवली आणि धनंजय मुंडे जगमित्र साखर कारखाना घोटाळ्याची चौकशी करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाला दिले आहेत. ज्ञानोबा सिताराम कोळी यांचा मृत्यू झालेला असताना त्यांच्या अंगठाचा ठसा लावून धनंजय मुंडे यांनी संमती पत्र घेतलं याची चौकशी व्हायला हवी.", असं किरीट सोमय्या म्हणाले. तसेच या प्रकरणात जागेची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात बीडला जाणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget