Shiv Sena vs BJP LIVE : पुन्हा सोमय्या वि. शिवसेना? भाजप नेते किरीट सोमय्यांचा आज कोर्लई दौरा
Shiv Sena vs BJP LIVE : भाजप नेते किरीट सोमय्या आज कोर्लई दौरा. कोर्लईच्या बंगल्यांबाबत ठाकरे कुटुंबीयांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी तर संजय राऊतांचा सोमय्यांवर पुन्हा हल्लाबोल
LIVE

Background
Kirit Somaiya Daura : कोलई ग्रामपंचायतीत शिंपडलं गोमूत्र
Kirit Somaiya Daura : कोर्लई येथील जमीन घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या यांनी तेथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळेस किरीट सोमय्या यांच्या सोबत आलेल्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. यावेळेस, शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करून ग्रामपंचायत कार्यालयात गोमूत्र शिंपडलं.
ग्रामपंचायत, सरपंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत का? : किरीट सोमय्या
LIVE UPDATES : ग्रामपंचायत, सरपंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत का? #KiritSomaiyya https://t.co/j6DK6dqZ0U pic.twitter.com/iYdrWMshKC
— ABP माझा (@abpmajhatv) February 18, 2022
नारायण राणे यांच्या टीकेला विनायक राऊतांकडून चोख उत्तर : संजय राऊत
आमचा केवळ शिवसेनेच्या विस्तारावर डोळा, बाकी कशावर नाही असं म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेला विनायक राऊत यांनी चोख उत्तर दिलं, असंही म्हटले आहेत.
Narayan Rane: संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे, वेळ आल्यानंतर बाहेर काढेन: नारायण राणे
संजय राऊतांनी शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले असा सवालही त्यांनी केला. संजय राऊतांना कसली भिती वाटते. संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे, वेळ आल्यानंतर ती बाहेर काढेन असंही ते म्हणाले.
संजय राऊतांना घाम का फुटला होता; नारायण राणेंचा राऊतांना टोला
राऊत सांगतात मी कुणाला घाबरत नाही, मग त्यांना घाम का फुटला होता असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही त्यांनी टोला हाणला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
