केशव उपाध्येंची 'वडाची सालं', उर्मिला मातोंडकरांचं 'आपला तो बाब्या', ट्विटरवर जोरदार खडाजंगी!
'हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले', असे ट्वीट फडणवीस यांनी केलं होतं.
Keshav Upadhye vs Urmila Matondkar : सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी एक मोठा निर्णय दिला आहे. महाराष्ट्रील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटनंतर काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी भाजपवर निशाना साधला. पण ट्वीटरवर उर्मिला मातोंडकर आणि भाजप नेते केशव उपाध्ये यांच्यामध्ये चांगलीच झुंपली. दोन्ही नेत्यांनी एकमेंकावर आरोप आणि टीकेच्या फैरी झाडल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं. 'हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले', असे ट्वीट फडणवीस यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटला काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर देत निशाना साधला.
उर्मिला मातोंडकर यांचे ट्वीट -
अभिनंदन!आनंद आहे “लोकशाही” वाचली याचा..पण अध्यक्षमहोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासुन राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे त्यावरही शोभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा. इथे फक्त ५० लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम १२ करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे. शोभा पण लाजली वाटतं..
अभिनंदन!आनंद आहे “लोकशाही” वाचली याचा..
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) January 28, 2022
पण अध्यक्षमहोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासुन राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा.इथे फक्त ५०लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम १२करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे https://t.co/mMu0IjbKnj
केशव उपाध्ये यांचं प्रत्युत्तर -
थोडी माहिती घ्या आपल वाचन चांगल आहे अस ऐकून आहे. दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. आमदारांना सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून निलंबित करण्यात आले होते. राहिला तुमच्या आमदाकीचा विषय तर त्यासाठी लोक न्यायालयात गेली होती, पणन्यायालयाने काही सांगितल नाही.
उर्मिला मातोंडकर यांचं प्रत्युत्तर -
अर्थातच विषय पुर्णतः वेगळे आहेत म्हणूनच “आनंद/अभिनंदन”.पण प्रश्न मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्कांचा आहे. आणि लोकशाहीचा तर आहेच आहे. त्यामुळे “वडाची साल” ऐवजी “आपला तो बाब्या” जास्त बरोबर आहे. माझ्या आमदारकीची चिंता नसावी.त्याने माझे काम थांबलेले नाही.
केशव उपाध्ये यांचा पलटवार -
आपली जळजळ, तळमळ ही केवळ 'आमदारकी'साठीच आहे, हे आपल्या ट्विटवरून लक्षात येतेच. महाराष्ट्रात एवढे गंभीर विषय घडत असताना, आपण त्यावर फारसे भाष्य केलेले दिसत नाही. पण आमदारकीचा विषय आला, की आपल्यातील 'प्रतिक्रियावादी' भूमिका सगळे काही स्पष्ट करते. बाकी आमदारकीसाठी शुभेच्छा.
उर्मिला मातोंडकर काय म्हणाल्या -
गेली २ वर्ष “जळजळ,तळमळ” आणि “जळफळाट” हे शब्द कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला माहित आहे. मुद्दा सोडुन बोलण्यात तथ्य नसतं. मुद्दा लोकशाहीचा, लोकहिताचा आहे. बाकी माझ्या जळजळीकरता antacid आहे Face with tears of joy आपण आपला विचार करा.
आता मात्र तुम्ही वडाची साल पिंपळाक करताय, आणि वर मुद्दा सोडून बोलण्यात तथ्य नसतं असंही म्हणताय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जळजळ/जळफळाट कुणाचा होतोय हे सूज्ञ जनता बघतेच आहे. पण तरी तुमचं ‘आपला तो बाब्या’ सुरुच आहे.. पब्लिक सूज्ञ है, सब जानती है.आता 🙏🙏 https://t.co/xEJJvuRAjf
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 28, 2022
केशव उपाध्ये -
आता मात्र तुम्ही वडाची साल पिंपळाक करताय, आणि वर मुद्दा सोडून बोलण्यात तथ्य नसतं असंही म्हणताय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जळजळ/जळफळाट कुणाचा होतोय हे सूज्ञ जनता बघतेच आहे. पण तरी तुमचं ‘आपला तो बाब्या’ सुरुच आहे.. पब्लिक सूज्ञ है, सब जानती है.