एक्स्प्लोर

प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे काकासाहेब चितळे यांचे निधन

मिरज येथे हृदय विकाराच्या धक्क्याने शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनिता चितळे, उद्योगपती गिरीश चितळे, मकरंद चितळे दोन मुले आणि मुलगी वीणा सहस्त्रबुद्धे, सूना नातवंडे असा परिवार आहे.

सांगली : प्रसिद्ध उद्योगपती आणि भिलवडी येथील मे.बी.जी. चितळे डेअरीचे संचालक प्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय भास्कर चितळे उर्फ काकासाहेब चितळे यांचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिरज येथे हृदय विकाराच्या धक्क्याने शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनिता चितळे, उद्योगपती गिरीश चितळे, मकरंद चितळे दोन मुले आणि मुलगी वीणा सहस्त्रबुद्धे, सूना नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी (7 फेब्रुवारी) रात्री प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. चितळे उद्योग समूहाचे डायरेक्टर गिरीश चितळे यांचे काकासाहेब चितळे वडील होते. चितळे डेअरी ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील भिलवडी गावात असलेली दुग्धोत्पादक संस्था असून याची स्थापना इ.स. 1939 मध्ये भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे यांनी केली होती. चितळे यांच्या दुसऱ्या पिढीतीले असलेले काकासाहेब यांनी मोठ्या हिंमतीने चितळे उद्योग पुढे चालवत या उद्योगात आधुनिकता आणली. शैक्षणिक, आरोग्य, नेत्रदान, रक्तदान, औद्योगिक चळवळीत काकासाहेब चितळे यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या दुग्ध उद्योग क्षेत्रासह कृष्णाकाठ परिसरावर शोककळा पसरली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध प्रक्रिया असो , दुध पाश्चरायजेशन असो किंवा विविध दुग्ध उत्पादने तयार करणारी यंत्रणा असो यात चितळे समूहाने देशभर मोठे नाव कमवले आहे. प्रतिदिन 2.4 लाख लिटर दुग्धोत्पादन क्षमतेची ही संस्था पुणे, मुंबई, सांगली तसेच इतर अनेक शहरांतून दूध पुरवठा व विक्री करते. सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे काकासाहेब चितळे यांचे मुळ गाव आहे. या ठिकाणाहुन चितळे बंधूनी आपल्या उद्योग समूहाची सुरूवात केली आणि आज जगभर त्यांची विविध उत्पादने पोहचली आहेत. दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि बाकरवाडी हे चितळेची प्रसिद्ध उत्पादने आहेत. मॅकेनिकल इंजिनिअर चे शिक्षण घेतल्यानंतर काकासाहेब यांनी वडील बाबासाहेब चितळे व भावंडा सोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत राहिले. भिले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकांचा धुरळा, गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजयी, सांगली, सातारा अन् नगरमध्ये कुणाची बाजी?
Maharashtra Live blog updates: जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकांचा धुरळा, गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजयी, सांगली, सातारा अन् नगरमध्ये कुणाची बाजी?
Ahilyanagar District Bank Election Result 2026: खासदार निलेश लंकेंनी मैदान मारलंच! अहिल्यानगर जिल्हा बँकेत दणदणीत विजय, भाजपच्या राहुल शिंदेंचा पराभव, किती मतं मिळाली?
खासदार निलेश लंकेंनी मैदान मारलंच! अहिल्यानगर जिल्हा बँकेत दणदणीत विजय, भाजपच्या राहुल शिंदेंचा पराभव, किती मतं मिळाली?
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget