एक्स्प्लोर
जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच : नागपूर पोलीस
लोया यांचा मृत्यू हृदय विकारामुळे झाल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती नागपूरचे पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली आहे.
![जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच : नागपूर पोलीस justice loya died by heart attack says nagpur police जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच : नागपूर पोलीस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/11124426/CBI-Judge-B-H-Loya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर नागपूर पोलिसांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. न्या. लोया यांचा मृत्यू हृदय विकारामुळे झाल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती नागपूरचे पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली आहे.
लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडे होता. त्यामध्ये हा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं निष्पन्न झाले असून त्या संदर्भात नागपूर पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे.
लोया यांच्या मृत्यू प्रकरण तपासावर नागपूर पोलीस काय म्हणाले?
- लोया यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना त्यांचे डॉ. प्रशांत राठी यांनी दिली.
- 1 डिसेंबर 2014 रोजी पहाटे 4 वाजता न्या. लोया यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे ईसीजी केलं, त्यात त्यांना हृदयविकार असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मेडिट्रीना रुग्णालयात नेण्यात आलं.
- तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
- त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं.
- शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात कोरोनरीच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
- त्यानंतर लोया यांचा मृतदेह रुग्णवाहिकेने लातूरला पाठवण्यात आला.
- या प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांनी दंदे रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल, तिथल्या डॉक्टरांचं मत घेतलं, मेडिट्रीना रुग्णालयाचे केस पेपर तपासले.
- शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालातही लोया यांचा मृत्यू कोरोनरीच्या अभावामुळे झाल्याचं निष्पन्न झालं.
- व्हिसेरा रिपोर्टमध्येही लोया यांच्या शरीरात विष वगैरे आढळलं नाही.
- अंतिम शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा रिपोर्टच्या आधारे डॉक्टरांनी लोया यांचा मृत्यू हृदय विकाराने झाल्याचा अंतिम निष्कर्ष दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)