एक्स्प्लोर

लालचुटुक रसाळ स्ट्रॉबेरीची चव आता विदर्भाच्या मातीत! महाबळेश्वरपेक्षाही गोड चव, 5 जातींची शेतकऱ्यांना भुरळ

विदर्भाच्या मातीतही गोड स्ट्रॉबेरीची चव चाखता येणार आहे. स्ट्रॉबेरीच्या 5 जातींवर कृषी विद्यापीठाने संशोधन हाती घेतलंय. यात काही तालुक्यांतील वातावरण स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याचे समोर आलंय.

Agriculture: लालचुटुक रसाळ स्ट्रॉबेरी. थंड प्रदेशात पिकणारी आंबडगोड स्ट्रॉबेरी (Strawberry Production) म्हटलं की महाबळेश्वरचं नाव येणं सहाजिक. महाबळेश्वरचं आणि स्ट्रॉबेरीचं समिकरण असलं तरी आता विदर्भातील मातीत महाबळेश्वरपेक्षा गोड स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेणं शक्य असल्याचं समोर आलंय.डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाने स्ट्रॉबेरीच्या पाच जातींवर संशोधन केलंय.विदर्भातील थंडी आणि प्रखर सूर्यकिरणांमुळे महाबळेश्वरपेक्षाही गोड स्ट्रॉबेरी उत्पादन घेता येत असल्याचं एका प्रयोगातून विद्यापीठाने सिद्ध करून दाखविलंय. त्यामुळं आता विदर्भाच्या मातीतही गोड स्ट्रॉबेरीची चव चाखता येणार आहे.

थंड प्रदेशात वाढणाऱ्या स्ट्रॉबेरीज आता विदर्भातल्या वातावरणात उत्पादन घेता येणार आहेत.  स्ट्रॉबेरीच्या 5 जातींवर कृषी विद्यापीठाने संशोधन हाती घेतलंय. यात अकोल्यातल्या पातूर, अकोट आणि तेल्हारा तालुक्यांतील वातावरण स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याचे समोर आलंय.

विदर्भातही रसाळ स्ट्रॉबेरीची चव!

आता विदर्भाच्या मातीतही तुम्हाला स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळणारेय. अकोल्यातल्या पातूर, अकोट आणि तेल्हारा तालुक्यांतील वातावरण स्ट्रॉबेरी'साठी पोषक असल्याचे समोर आलेये.. यामुळे या भागातही या पिकांचा प्रसार करण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा मानस आहे. विशेष म्हणजे, तेल्हारा तालुक्यातल्या अंकित म्हसाळ या 26 वर्षीय तरुणाने स्ट्रॉबेरीची लागवड केली आहेय. इतकेच नव्हेतर वर्धा जिल्ह्यातल्या सेलसुरा कृषी विज्ञान केंद्रांतर्गत 8 शेतकऱ्यांनी महाबळेश्वर येथून रोपे आणून 18 हेक्टरवर स्ट्रॉबेरी लागवड केलीये.

शेतकऱ्यांनाही स्ट्रॉबेरीची भुरळ, कमी क्षेत्रात लागवड सुरु

एका एकरात चार ते पाच लाख रुपयांचं शेतकऱ्यांना उत्पादन झालंये. 2 लाखांपासून ते 2 लाख 50 हजार रुपयांपर्यत स्ट्रॉबेरीसाठी लागवड खर्च लागलाय. त्यातून लागवड खर्च काढत 2 लाखांवर उत्पन्न या शेतकऱ्यांना मिळालेत. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पुढाकार देत, मार्गदर्शन करीत असल्याचं  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ जीवन कथोरे यांनी सांगितले. विदर्भातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची भुरळ पडू लागली आहे. काही अकोल्यातील काही तालुक्यांमध्ये कमी क्षेत्रात स्ट्रॉबेरी घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. स्ट्रॉबेरी पिकाची लागवड साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला केली जातंय. ऑक्टोबरपासून जानेवरीपर्यंत विदर्भात हिवाळा ऋतू राहतो. म्हणून थंडीही चांगली राहते. विदर्भात थंडीसह प्रखर सूर्यकिरणेही या पिकावर पडते, आणि पुढं सूर्यकिरणे स्ट्रॉबेरी पिकात गोडवा निर्माण करण्याचं काम करते. विशेष  म्हणजे, महाबळेश्वरमध्ये विदर्भाच्या तुलनेत थंडी फार जास्त राहतं. मात्र, तिथे पिकांना प्रखर सूर्य किरणामूळ मिळत नाहीए. परंतु विदर्भात सूर्यकिरण प्रखरपणे मिळतात. म्हणून विदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्ट्रॉबेरी लागवडीवर भर दिला असल्याचं तेल्हाऱ्यातील गजानन म्हसाळ यांनी सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीचRSS : विश्व हिंदू परिषदेचे आठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांना शरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
Embed widget