एक्स्प्लोर
Advertisement
JOB Majha : पवन हंस लिमिटेड आणि इंडियन रेअर अर्थ लि. येथे नोकरीची संधी
पवन हंस लिमिटेड आणि इंडियन रेअर अर्थ लि.येथे नोकरीची संधी आहे. ज्यांना नोकरीची गरज आहे त्या तरुणांना याठिकाणी अर्ज करता येईल.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
पवन हंस लिमिटेड मुंबई येथे विविध पदांची भरती
एकूण जागा : 28
पहिली पोस्ट- ट्रेनी टेक्निशियन B1 (A&C)
- एकूण जागा - 18
- शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/ एरोनॉटिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये डिप्लोमा किंवा एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षाचा कोर्स किंवा डीजीसीए मान्यताप्राप्त संस्थेतून एएमई कोर्स, एक वर्षाचा अनुभव
- वयाची अट : 25 वर्षे
दुसरी पोस्ट - ट्रेनी टेक्निशियन B2 (एव्हिओनिक्स)
- एकूण जागा - 10
- शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/ एरोनॉटिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये डिप्लोमा किंवा एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षाचा कोर्स किंवा डीजीसीए मान्यताप्राप्त संस्थेतून एएमई कोर्स, एक वर्षाचा अनुभव
- नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
- वयाची अट : 25 वर्षे
- अर्ज पद्धती : ऑफलाईन
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2021
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR&A) Pawan Hans Ltd., Juhu Aerodrome, S.V. Road, Vile Parle (West), Mumbai- 400 056.
- अधिकृत संकेतस्थळ : www.pawanhans.co.in
इंडियन रेअर अर्थ लि.मध्ये विविध पदांच्या एकूण 54 जागांसाठी भरती होते आहे
- पहिली पोस्ट - पदवीधर प्रशिक्षणार्थी
- जागा - 13
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून सीए इंटरमीडिएट किंवा सीएमए इंटरमीडिएट/ वाणिज्य मध्ये ग्रॅज्युएट किंवा मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठकडून कोणत्याही विषयात पदवीधर
दुसरी पोस्ट - डिप्लोमा प्रशिक्षणार्थी
- जागा - 18
- शैक्षणिक पात्रता : AICTE किंवा समकक्ष द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून ३ वर्षांचा खनन / केमिकल / यांत्रिक / इलेक्ट्रिकल / सिव्हिल अभियांत्रिकी डिप्लोमा
तिसरी पोस्ट - व्यापारी प्रशिक्षणार्थी
- जागा - 20
- शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त मंडळाकडून एसएससी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- ITI/ NAC
- दोन वर्षे अनुभव.
- वयाची अट - 26 वर्षे
- अर्ज पद्धती : ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.irel.co.in
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement