Job Majha: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज
Job Majha: पु्ण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
![Job Majha: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज Job Majha Film and Television Institute of India FTII recruitment Job Majha: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/74cff9e0c44c166b5288e84e8bd2067d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता काय आहे आणि इतर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)
एकूण 31 जागांसाठी ही भरती होत आहे.
पहिली पोस्ट – असोसिएट प्रोफेसर
एकूण जागा – 4
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा, 4 वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी आणि 6 वर्षांचा अनुभव किंवा पदवीधर आणि 8 वर्षांचा अनुभव
दुसरी पोस्ट – असिस्टंट प्रोफेसर
एकूण जागा – 16
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा आणि 2 वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी आणि 4 वर्षांचा अनुभव किंवा पदवीधर आणि 5 वर्षांचा अनुभव
तिसरी पोस्ट - असिस्टंट IT मॅनेजर
एकूण जागा – 1
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि MCA/MCM आणि 3 वर्षांचा अनुभव किंवा पदवीधर आणि 6 वर्षांचा अनुभव
चौथी पोस्ट - असिस्टंट अकॅडेमिक को-ऑर्डिनेटर
एकूण जागा – 1
शैणक्षिक पात्रता - पदव्युत्तर पदवी आणि १ वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर आणि 3 वर्षांचा अनुभव
पाचवी पोस्ट - असिस्टंट फिल्म रिसर्च ऑफिसर
एकूण जागा – 1
शैणक्षिक पात्रता - पदव्युत्तर पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर आणि 3 वर्षांचा अनुभव
सहावी पोस्ट – असिस्टंट आउटरिच ऑफिसर
एकूण जागा - 1
शैणक्षिक पात्रता - पदव्युत्तर पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर आणि 3 वर्षांचा अनुभव
सातवी पोस्ट - असिस्टंट डिजिटल कलरिस्ट
एकूण जागा- 4
शैक्षणिक पात्रता – पदवीधर आणि 1 वर्षाचा अनुभव किंवा 12 वी उत्तीर्ण आणि 4 वर्षांचा अनुभव
आठवी पोस्ट - साऊंड रेकॉर्डिस्ट
एकूण जागा – 1
शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि 1 वर्षाचा अनुभव किंवा 12 वी उत्तीर्ण आणि 4 वर्षांचा अनुभव
नववी पोस्ट - मेडिकल ऑफिसर
एकूण जागा – 2
शैक्षणिक पात्रता - BAMS/MBBS, 5 वर्षांचा अनुभव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2022
मुलाखत होणार आहे. मुलाखतीची तारीख – 8 मार्च ते 13 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट - www.ftii.ac.in
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)