एक्स्प्लोर

NCP : 'जितेंद्र आव्हाडांनी थेट फडणवीसांचे पाय धरले होते'; हसन मुश्रीफांनी भरसभेत केला गौप्यस्फोट

Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठ वक्तव्य करत जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे.

बीड : शरद पवारांनी (Sharad Pawar) बीड जिल्ह्यात सभा घेतल्यावर आता आज अजित पवारांची देखील बीड जिल्ह्यात सभा होत आहे. दरम्यान यावेळी सभेत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अनेक मंत्री देखील उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मोठ वक्तव्य करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. "जितेंद्र आव्हाड हा भेकड माणूस आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडला होता आणि निवडणूक न लढण्याबाबत बोलला होता. एक गुन्हा दाखल झाला त्यामुळे असं वागला होता”, असे मुश्रीफ म्हणाले आहेत. 

यावेळी बोलतांना मुश्रीफ म्हणत आहे की, जयंत पाटील यांनी मला एक थक्क करणारे वक्तव्य सांगितले होते. एकदा ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते. दरम्यान यावेळी जयंत पाटील आणि अजित दादांना घेऊन आव्हाड अध्यक्षांच्या दालनात गेले होते. यावेळी तिथे तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी फडणवीस यांचे पाया पडले आणि सांगितले की विधानसभा निवडणूक लढवणार नाही. असा भेकड माणूस शरद पवारांच्या समोर वक्तव्य करतो आणि ते ऐकतात याचे आश्चर्य वाटते, असे हसन मुश्रीफ म्हणाले. 

आव्हाडांनी चुकीचं वक्तव्य केलं...

काल कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत जे भाषण केले त्यामुळे याचं खेद व्यक्त करतो. अजित पवारांनी आधीच स्पष्ट केले होते की, कोणावरही टीका करायची नाही. असे असतांना आव्हाड यांनी आमच्यावर गद्दार, गद्दारांचे रक्त, हे कसे बिळातून बाहेर आले आहेत अशी भाषा केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे माझा राग अनावर झाला होता आणि मी कोल्हापूर पायतान प्रसिद्ध असल्याचं म्हटलो, असल्याचे सुद्धा मुश्रीफ म्हणाले. 

राज्याच्या विकासासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला... 

अजित दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईत आमचा मेळावा झाला. त्यामध्ये अजित पवारांनी आमची भूमिका स्पष्ट केली होती. 2014 काय घटना घडली, 2017, 2019 आणि 2022 ला कोणत्या कोणत्या घटना घडल्या, तसेच कशासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला याची त्यांनी माहिती दिली. राज्याच्या, देशाच्या विकासासाठी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विस्ताराचे हित पाहता आम्ही निर्णय घेतला होता, असे मुश्रीफ म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवार गटाकडून आज बीडमध्ये शक्तिप्रदर्शन; एकाच व्हॅनमधून 9 मंत्री सभास्थळी दाखल होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget