मी ओघात बोलून गेलो, पण अभ्यासाशिवाय काही बोलत नाही, तरीही भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो : जितेंद्र आव्हाड
मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
Jitendra Awhad Press Conferance at Shirdi: शिर्डी : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं. आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. अशातच आज (गुरुवारी) जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, "मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही."
इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही : जितेंद्र आव्हाड
"मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे याविरोधात उभे राहिले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, वाल्मिकी रामायणामध्ये सहा स्कंद आहेत. त्यातील अयोध्ये स्कंदेतील 52 श्लोक 102 जो आहे तो मी वाचून दाखवत नाही, कारण मला वाद वाढवायचा नाही.", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
"नंतर एक 1891 चं डॉक्युमेंट प बंगालमध्ये पब्लिश झालं आहे. आताचं नाही. मी ते वाचून दाखवणार नाही, ज्यांना वाचायचं आहे त्यांना मी कॉपी देतो. मला भारतातील अनेक आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी पेपर्स पाठवले. त्या त्या काळात कसे ट्रान्सलेशन केलं गेलं. वाल्मिकी रामायणात जे लिहिलं असेल त्यामध्ये कोणाचा आक्षेप आहे का, त्यावर बोलावं.", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही : जितेंद्र आव्हाड
"अन्न पुराणी नावाचा पिक्चर आला आहे. 1 डिसेंबर 2023 ला. दक्षिणेतील सुपरस्टार दोघे त्यामध्ये आहेत. त्यामध्ये त्यांनी पाठांतर वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातील श्लोक म्हणून दाखवला आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. पण त्याही वरती मी जाऊन सांगतो, आजकाल अभ्यासाला महत्व नाही, भावनांना महत्व आहे. त्यावर मी म्हणेन, माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.", असं आव्हाड म्हणाले.
मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता : जितेंद्र आव्हाड
आव्हाड म्हणाले की, "मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे. फ्रीडम ऑफ स्पीच आहे. वाल्मिकींनी जे लिहिलं तर गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल हे मी बोलणार नाही. मी गुन्ह्या बिन्याला घाबरत नाही. लॉजिकल बोलायचं असेल तर या बाकी लॉजिकच मान्य नसेल तर खेद व्यक्त करणार अजून काय करणार."
"सुधीर दास या महंतांनी कोल्हापूरच्या महाराणींना वैदीक की पौराणिक या वादात अडकवलं होतं. जो शाहू महाराजांबाबत वेदोक्त प्रकरण झालं होतं, ते महाराणींना या सुधीर दासांनी सांगितलं. त्या सुधीर दासांच्या कहाण्या खूप आहेत, पण मी काही बोलणार नाही. त्यांच्या डोक्यात आजही वेदोक्त पुराणोक्त आहे.", असंही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
पाहा व्हिडीओ : Jitendra Awhad EXCLUSIVE : तुमचा राम निवडणुकीच्या बाजारात, आमचा राम ह्रदयात : जितेंद्र आव्हाड
महत्त्वाच्या इतर बातम्या :
जितेंद्र आव्हाडांना अटक करा, राम कदम आक्रमक, राज्यभरात भाजपचं आंदोलन