Kupwara: घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; एका दहशतवाद्यांला कंठस्नान
नियंत्रण रेषेजवळील करनाह सेक्टरजवळ झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.
Kupwara: दहशतवाद्यांच्या कुरापती संपण्याचं नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती वाढत आहेत. काश्मिरच्या कुपवाडाजवळ नियंत्रणरेषा (LOC)ओलांडून येण्याचा घुसखोरांचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला आहे. भारतीय लष्कराच्या या कामगिरीमुळे भारतात घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पडला आहे. नियंत्रण रेषेजवळील करनाह सेक्टरजवळ झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.
एक दहशतवादी ठार झाला तर दुसरा फरार
समोर आलेल्या माहितीनुसार, या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांची एक टोळी मंगळवारी सीमा सशस्त्र दलाची नजर चूकवून नियंत्रण रेषा ओलंडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र भारतीय लष्कराच्या जवानांना काही हालचाल आढळली. ती टोळी दहशतवाद्यांची असावी असा संशय त्यांना आला. या टोळीतील दोन दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात यश देखील मिळाले. सशस्त्र दलाने केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला तर दुसरा दहशतवादी फरार आहे. दुसऱ्या दहशतवाद्याला शोधण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक एके 47 जप्त करण्यात आली आहे.
सीमा भागात हायअलर्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडील मोठ्या प्रमाणात दारू गोळा होता. तो जप्त करण्यात आला आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे.काही दहशतवादी टोळ्या घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. या घटनेने त्याची सत्यताही समोर आली आहे. सीमा भागात जवानांना हायअलर्ट देण्यात आला आहे.
कुपवाडमधून तीन दहशतवाद्यांना अटक
ऑगस्ट महिन्यात कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा यंत्रणांनी हंदवाडा परिसरात एका अल्पवयीन मुलासह तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या तिघांनाही परिसरात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे काम देण्यात आले होते.
सुरक्षा दलांना मोठे यश, दहशतवाद्यांचा खात्मा
सप्टेंबर महिन्यात काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत 2 घुसखोर आणि 14 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. त्यात एक पाकिस्तानी दहशतवादीही होता. यापैकी दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बास्कुचन आणि चित्रगाम गावात झालेल्या दोन चकमकीत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये 3, अनंतनाग आणि कुलगाममध्ये प्रत्येकी 2 आणि श्रीनगर, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे प्रत्येकी एक चकमक झाली. कुपवाड्यात दोन दहशतवादी मारले गेले.