Jalgaon News : जळगाव शहरात तीन मजली इमारत कोसळली, दोन महिलांना वाचविण्यात यश, एक महिला ढिगाऱ्याखाली
Jalgaon News : जळगाव (Jalgaon) शहरातून मोठी बातमी समोर येत असून तीन मजली इमारत कोसळल्याची (Building Collasped) घटना घडली आहे.
जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरातून मोठी बातमी समोर येत असून तीन मजली इमारत कोसळल्याची (Building Collasped) घटना घडली आहे. यात तीन जणांना वाचविण्यात यश आलं असून अन्य एक महिला कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून (Rescue Operation) महिलेला शोधण्याचे काम सुरू आहे.
जळगाव शहरातील (Jalgaon City) शिवाजी नगर परिसरात तीन मजली जुनी इमारत कोसळल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एका कुटुंबातील तिघांना वाचविण्यात यश आले आहे. तर एक सत्तर वर्षीय महिला ढिगाऱ्याखाली अडकल्याचं समोर आलं आहे. या महिलेला वाचविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून (Jalgaon JMC) बचाव कार्य राबविले जात आहे. राजश्री पाठक असे (Rajshree Pathak) या महिलेचे नाव असून घटनास्थळी बचाव पथकाच्या माध्यमातून इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी मनपा महापौर जयश्री महाजन, आयुक्त विद्या गायकवाड आणि जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मशिद समोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. या घटनेत दोन महिला या इमारतीखाली दाबल्या गेल्या होत्या. त्यापैकी एका महिलेला वाचविण्यात यश आले असून दुसऱ्या महिलेला वाचविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला दुसरीकडे राहत होत्या. कधीतरी या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येत होत्या. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक तीन मजली इमारत कोसळली. त्यात या दोन्ही महिला ढिगाऱ्याखाली अडकल्या गेल्या. दरम्यान, लागलीच बचावकार्य सुरू केल्याने दोघांपैकी एका 52 वर्षीय महिलेला बाहेर काढण्यात यश आले. तर दुसऱ्या महिलेला शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
गुलाबराव पाटील यांच्याकडून घटनेचा आढावा
अद्याप 75 वर्षीय वृद्ध महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. इमारत कोसळल्याच्या घटनेवर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. जळगाव शहरात इमारत कोसळल्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळाली आहे. या इमारतीखाली 75 वर्षाची एक व्यक्ती दाबल्या गेल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. दोन जणांना वाचविण्यात यश आल आहे. महापालिकेच्या पथकाकडून बचावकार्य सुरू असून काही वेळानंतर इमारतीखाली दाबल्या गेलेल्या व्यक्ती संदर्भात नेमकी माहिती समोर येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Jalgaon : दुमजली जीर्ण इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश