(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon Accident : देवीच्या दर्शनासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला; बस आणि कारच्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू
Jalgaon Accident: जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात बस आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात कार मधील तिघांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Jalgaon Accident जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातून एक अपघाताची (Accident News) मोठी बातमी समोर आली आहे. यात बस आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात कार मधील तिघांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील चोपडा-धरणगाव रस्त्यावर चोपडा सुत गिरणी जवळ ही अपघाताची घटना घडली आहे. कारमधील वाणी कुटुंब जळगावमधील मनू देवीच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यात येत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. तर यातील एकावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बस आणि कारच्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा-नाशिक ही शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी सहा वाजता निघाली. दरम्यान ही बस वाटेत असताना चोपड्या पासून पाच किमी अंतरावर असलेल्या सूतगिरणी जवळ समोरून येणाऱ्या कार आणि बसचा जोरदार अपघात झाला. यावेळी कारमधील तिघांचा जागेवर मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा शहरात उपचार सुरू आहेत. कारमधील वाणी कुटुंब जळगावमधील मनू देवीच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यात येत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटणेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
समृद्धी महामार्गावर खाजगी प्रवासी बसवर अज्ञातांकडून दगडफेक
समृद्धी महामार्गावर बिबी गावाजवळ मध्यरात्री दोन माही ट्रॅव्हल्सच्या खाजगी प्रवासी बसेस वर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत एका बस मधील चालकासह दोन प्रवासी जखमी झाले आहे. दगडफेक केल्यानंतर बस न थांबल्याने दगडफेक करणारे फरार झाले आहे. दोन किमी अंतरावर बस थांबवून चाकलाने प्रसंगावधान राखत पोलिसांना फोन करून याबाबत माहिती आहे. तर यातील जखमींवर समृद्धी रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी उपचार केले आहे. मिळलेल्या माहितीनुसार, दोन्ही बसेस नागपूरकडून मुंबईकडे जात होत्या. यात बस क्रमांक MH29 BE 6777 आणि अजून एक अशा दोन्ही बसेस माही ट्रॅव्हल्सच्या होत्या. मात्र ही दगडफेक नेमकी कोणी आणि का केली हे अद्याप कळू शकलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटणेमुळे समृद्धी महामार्गावरील रात्रीचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हे ही वाचा