एक्स्प्लोर

मुखेड तालुक्यातील बामणीचे सुपूत्र ITBP मधील असिस्टंट कमांडन्ट सुधाकर शिंदे छत्तीसगडमध्ये शहीद

मुखेड तालुक्यातील बामणी येथील रहिवाशी ITBP मधील असिस्टंट कमांडन्ट सुधाकर शिंदे छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत.

नांदेड : मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद जवळ छोट्याशा बामणी गावातील इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसमध्ये (ITBP) कार्यरत असिस्टंट कमांडन्ट सुधाकर शिंदे आज देशाची सेवा करताना धारातिर्थी पडले. हा हल्ला आज 20 ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांनी घात लावून केला. या हल्यात पंजाब येथील गुरमुखसिंघ यांचाही देह देशाच्या कामी आला.

नांदेड जिल्ह्यातील बामणी ता. मुखेड या गावचे सुधाकर शिंदे हे सन 2000 मध्ये परभणी येथील कृषी विद्यापीठातून कृषी पदवी प्राप्त करून सन 2001 मध्ये आयटीबीपीमध्ये सब इन्सपेक्टर या पदावर रुजू झाले होते. महाराष्ट्राची शान वाढवत त्यांनी हळूहळू सहाय्यक समादेशक (असिस्टंट कमांडन्ट) या पदापर्यंत पदोन्नती मिळवली होती. सन 2019 मध्ये त्यांची नियुक्ती छत्तीसगड राज्यात नक्षल प्रतिबंधक पथकात झाली.

आज 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास नक्षलवाद्यांनी घात लावून केलेल्या हल्यात सुधाकर शिंदेसह एएसआय गुरमुखसिंघ हे दोन अधिकारी धारातिर्थी पडले आहेत. नक्षलवाद्यांनी दोन बुलेटप्रुफ जॅकेट, एक वायरलेस सेट, एक एके 47 रायफल आणि गोळ्या लुटून नेल्या आहेत. महाराष्ट्राच्या एका शूरवीराने नक्षलवाद्यांशी लढताना आपला जीव देशासाठी अर्पण करून एक आदर्श दाखवला आहे. त्यांचे पार्थिव विमानाने उद्या नांदेड येथील गुरू गोविंद सिंगजी विमानतळावर दाखल होणार असून मुखेड तालुक्यातील बामणी या गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या या अकाली जाण्याने मात्र बामणी गाव परिसरात शोककळा पसरली आहे.

मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून श्रद्धांजली
नांदेडचे सुपूत्र व आयटीबीपीचे असिस्टंट कमांडन्ट सुधाकर शिंदे यांना छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण देश शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. शहीद सुधाकर शिंदे अमर रहे!, असे ट्विट मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: शासन नियुक्त संचालक पोहचले! सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 संचालक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर, थोड्याच वेळात निवडणूक
Maharashtra Live blog updates: शासन नियुक्त संचालक पोहचले! सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 संचालक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर, थोड्याच वेळात निवडणूक
Gokul Chairman Election 2026 Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Nagpur Couple Death Marathi News: दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Gokul Chairman Election 2026 Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Embed widget