एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काळ्याचं पांढरं केल्याच्या संशयातून राज्यातील 64 ज्वेलर्सची चौकशी
मुंबई : राज्यभरातील जवळपास 64 ज्वेलर्सवर आयकर खात्यानं कारवाईचा बडगा उगारला आहे. नोटाबंदीनंतर काळ्याचं पांढरं केल्याच्या संशयातून या ज्वेलर्सची चौकशी करण्यात आली आहे. पुण्यात आणि नाशकात काही महत्त्वाच्या ज्वेलर्सवर छापाही घालण्यात आला आहे.
पुण्यातील आयकर विभागाच्या मुख्य कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील 13 ज्वेलर्सची चौकशी करण्यात आली. तसंच नागपूरच्या 9, नाशिकच्या 7 ठाण्यात 5, कल्याणमध्ये 5, सोलापूरमध्ये 5 अकोल्यात 4 ज्वेलर्सवर आयकर विभागानं कारवाईचं शस्त्र उपसलं आहे. यात नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर कॅश डिपॉझिट झालेल्या ज्वेलर्सना आयकर विभागानं रडारवर घेतलं आहे.
पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या 30 कोटींच्या कॅश ट्रान्झक्शन्सची तपासणीही आयकर खात्यानं केली आहे. आयकर खात्यानं बुधवारी ज्वेलर्सवरील कारवाईला सुरुवात केली. यात ज्वेलर्सच्या सर्व अकाऊंट्सची तपासणीही करण्यात आली. आयकर खात्यानं सुरु केलेली ही कारवाई आजही सुरु राहणार आहे. दरम्यान नोटाबंदीनंतर सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती. चढ्या भावानं सोनं विकलेल्या ज्वेलर्सची चौकशी करणार असल्याचं आयकर खात्यानं यापूर्वीच सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement