एक्स्प्लोर

पंढरपुरातील 15 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या घाटाचे लोकार्पण अडचणीत

महाराष्ट्र शासनाने या संस्थेला 200 मीटरची जागा घाट बांधण्यासाठी दिली होती. या जागेवर इस्कॉनकडून जगभरातील देणगीदारांच्या मदतीने 15 कोटी रुपये खर्चून येथे 150 मीटर लांबीचा घाट चंद्रभागेच्या पैलतीरावर उभारला आहे.

पंढरपूर : इस्कॉन संस्थेने चंद्रभागेच्या पैलतीरावर भाविकांच्या स्नानासाठी 15 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या घाटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारे लोकार्पण अडचणीत आले  आहे.  इस्कॉनकडून या घाटाची उभारणी करताना योग्य परवानग्या घेतल्या नसल्याचा आक्षेप जिल्हा प्रशासनाने घेतल्याने आता हे लोकार्पण होणार का? हा प्रश्न उभा राहिला आहे. महाराष्ट्र शासनाने या संस्थेला 200 मीटरची जागा घाट बांधण्यासाठी दिली होती. या जागेवर इस्कॉनकडून जगभरातील देणगीदारांच्या मदतीने 15 कोटी रुपये खर्चून येथे 150 मीटर लांबीचा घाट चंद्रभागेच्या पैलतीरावर उभारला आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणाहून उद्धव ठाकरे यांनी चंद्रभागेच्या महाआरती केली होती. आता या घाटाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केल्याचे संस्थेचे प्रवक्ते डॉ शामसुंदर शर्मा यांनी सांगितले आहे.  या घाटावर चंद्रभागा मातेचे मंदिर देखील उभारण्याचे काम सुरु असून रोज सायंकाळी याठिकाणी कशी प्रमाणे चंद्रभागेच्या आरती करण्याचे नियोजन इस्कॉनकडून करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या उद्घाटनासाठी जगभरातून इस्कॉनचे सात हजार भक्त पंढरपूर येथे येणार असून या कार्यक्रमासाठी इस्कॉनकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने या घाट बांधणीत कायदेशीर पूर्तता झाली नसल्याने या लोकार्पण सोहळ्याबाबत सर्व अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला आहे. आषाढी दशमी अर्थात 11 जुलै रोजी होऊ घातलेल्या या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी झाली असताना प्रशासनाच्या भूमिकेमुळे इस्कॉनच्या अडचणीत वाढ झाली आहे.  आम्ही अहवाल सरकारला दिला असून आता पुढचा निर्णय शासनाला घ्यायचा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget