एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar: सप्टेंबर महिन्यात संभाजीनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेचे आयोजन

Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस यंत्रणा आणि पर्यटन विभाग समन्वयाने आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेसाठी काम करण्यात येणार आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) विविध पर्यटनस्थळ असून, पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासन (District Administration) विविध उपक्रम राबवित आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेचे आयोजन (International Tourism Conference) छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात आले आहे. तसेच वेरुळ महोत्सावाचे आयोजन करण्यात येत आहे. हे दोन्ही उपक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी पर्यटन विकासातील महत्वाचे पाऊल असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिल आहे. तर जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस यंत्रणा आणि पर्यटन विभाग समन्वयाने आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेसाठी काम करण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी म्हंटले आहे. भारत पर्यटन चालक एजन्सी सदस्याच्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली आहे. 

सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या जागतिक पर्यटन परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येणार असून, यामध्ये एक हजार टूर ऑपरेटरचा सहभाग राहणार आहे.  त्यामुळे त्यांच्या राहण्याच्या व इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत संबधित विभागांना सूचित करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून कार्यक्रम स्थळाचे फायर ऑडिट करुन सुरुक्षाबाबतची कार्यवाही करावी. तसेच शहराचे ब्रॅन्डींग करण्यासाठी डिजिटल होर्डिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनस्थळ, संस्कृती याविषयची माहिती देण्याबरोबर निमंत्रितांचे स्वागत, आदरातिथ्य करण्याबाबत तयारीचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी पाण्डेय घेतला आहे.

पर्यटन परिषदेचे आयोजन सुट्टीच्या काळात करावा

या आढावा बैठकीत मुंबईतून दूरदृष्यप्रणालीद्वारे लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलिप शिंदे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी वेरुळ महोत्सव शक्य तो सुट्टीच्या काळात आयोजित करावा, जेणेकरुन पालक, विद्यार्थी अधिक संख्येने सहभागी होतील. अशी सूचना शिंदे यांनी जिल्हा प्रशासनास केली. यावेळी पर्यटन परिषद आणि वेरुळ महोत्सवादरम्यान सांस्कृतिक आयोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. तर या बैठकीत महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पर्यटनचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक संतोष झगडे, औरंगाबाद पर्यटन विकास संस्थेचे जसवंत सिंग यांच्यासह राजीव मेहरा, रवी गोसावी आदी पर्यटन श्रेत्रातील संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एक हजार टूर ऑपरेटर शहरात येण्याची शक्यता

सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या जागतिक पर्यटन परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येणार आहे. या जागतिक पर्यटन परिषदेच्या निमित्ताने एक हजार टुर ऑपरेटर शहरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. दरम्यान याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी यांनी भारत पर्यटन चालक एजन्सी सदस्यांची आढावा बैठक घेऊन त्यांच्याही सूचना जाणून घेतल्या. सोबतच प्रशासनाची भूमिका देखील यावेळी स्पष्ट केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Chhatrapati Sambhaji Nagar : पावसाने नागरिकांना त्रास झाल्यास कारवाई; संभाजीनगर मनपा प्रशासकांचा अधिकाऱ्यांना इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget