एक्स्प्लोर
अशोक चव्हाणांच्या तेराव्याला या, काँग्रेसच्या अंतर्गत वादाची हीन पातळी
नागपूर : निवडणुका आल्या की उमेदवारीची संधी न मिळणाऱ्या इच्छुकांमध्ये रुसवेफुगवे, नाराजी, बंडखोरी पाहायला मिळते. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नागपुरात काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चक्क पत्रिका छापून नेत्यांच्या राजकीय तेराव्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि प्रदेश सरचिटणीस अभिजीत वंजारी यांचं 15 तारखेला राजकीय तेरावं आयोजित केल्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच निकालाच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला गोड जेवणाला या, असंही पत्रिकेत छापण्यात आलं आहे.
डबल बी फॉर्म वाटले गेले आणि आपल्याच कार्यकर्त्यांनी फसवणूक केल्याचे दावे बी फॉर्म प्रकारणात झाले. शहर अध्यक्षांच्या गाडीची तोडफोड झाली, पोलिस तक्रारी झाल्या आणि आता थेट आपल्याच नेत्यांच्या तेराव्याचं आमंत्रण देण्यापर्यंत हीन पातळी गाठली गेली. तिकीटवाटपावरुन झालेला गोंधळ आणि नाराजी उघडपणे व्यक्त होत असला तरी ही पत्रिका नेमकी कोणी छापली, हा प्रश्न कायम आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement