एक्स्प्लोर
इनोव्हाला अपघात, कारमधील बाटल्या फुटून तिघे गंभीर जखमी
सिंधुदुर्ग : गोवा बनावटीची अवैध दारु वाहतूक करणारी इनोव्हा कार झाडावर आदळून मोठा अपघात झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा हायवेवर कुडाळजवळ आकेरीत हा अपघात झाला असून तिघे जण गंभीर जखमी आहेत.
अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून अपघातग्रस्त इनोव्हा कार पंढरपूर पासिंगची आहे. गाडीतील दारुच्या बाटल्या फुटून तिघे जण जखमी झाले आहेत. गाडीचा अपघात होताच अनेकांनी दारुच्या बाटल्या पळवल्या.
दाणोलीतून गाडी भरुन दारु आल्याची चर्चा सुरु आहे. चोख पोलीस बंदोबस्त असताना पोलिसांच्या तावडीतून गाडी निसटली कशी? हा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात अवैध दारु धंदयाला ऊत आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारु वाहतूक होत असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांना अवैध दारु वाहतूकीसाठी लाखो रुपयांचे हप्ते मिळत असल्याची घटनास्थळी चर्चा आहे. दारु दाणोली मार्गे आली की बांदा चेकपोस्टवरुन याबाबत घटनास्थळावर दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement