एक्स्प्लोर

Mumbai: आयआयटी मुंबईला नंदन नीलकेणी यांच्याकडून 315 कोटींची देणगी

Mumbai: आयआयटी संस्थेच्या म्हणण्यानुसार, नीलेकणी हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आतापर्यंत संस्थेला 400 कोटी रुपये दान केले आहेत.

Mumbai: इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी (Nandan Nilekani) यांनी मंगळवारी आयआयटी मुंबईला 315 कोटी रुपये देणगी देत असल्याची घोषणा केली. 1973 मध्ये नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईमध्ये (IIT Mumbai) प्रवेश घेतला होता आणि तिथूनच त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची (Electric Engineering) बॅचलर पदवी प्राप्त केली. आज 50 वर्षांपूर्वी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी नीलेकणी यांनी आयआयटीमध्ये (IIT) प्रवेश घेतला होता.

काय आहे इतकी मोठी देणगी देण्यामागचं कारण?

इन्फोसिसचे (Infosys) सह-संस्थापक नंदन नीलेकणी हे आयआयटी मुंबईचे विद्यार्थी आहेत, गेल्या 50 वर्षांपासून ते या संस्थेशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात असतात. त्यांना आयआयटी मुंबई संस्थेशी जोडले जाऊन आज 50 वर्षे पूर्ण झाली. 1973 मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेण्यासाठी नीलेकणी यांनी आयआयटीमध्ये प्रवेश घेतला होता. या शैक्षणिक संस्थेसोबत असलेल्या संबंधाला 50 वर्षे पूर्ण झाली. प्रथम एक विद्यार्थी म्हणून, आणि नंतर 2011-2015 पर्यंत तिच्या प्रशासक मंडळावर राहण्यापर्यंत आजवर ते संस्थेशी जोडले गेलेले आहेत, त्याचीच एक पोचपावती म्हणून नंदन नीलेकणी यांनी मुंबई आयआयटीला 315 कोटी रुपये दान केले आहेत.

आयआयटी मुंबईला नीलेकणी यांच्याकडून एकूण 400 कोटी दान

आयआयटी मुंबईने जारी केलेल्या वृत्तपत्र निवेदनानुसार, याआधीदेखील नीलेकणी यांनी आयआयटीला 85 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. आता दिलेली रक्कम मिळून नीलेकणी यांनी आतापर्यंत संस्थेला एकूण 400 कोटी रुपयांची मदत केली आहे. याआधी दिलेला निधी हा नवीन वसतिगृहे बांधणे, स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला वीजपुरवठा करणे आणि देशाचे पहिले विद्यापीठ इनक्यूबेटर स्थापित करणे यासाठी होते, अशी माहिती आयआयटी मुंबईने दिली.

आयआयटी नवीन 315 कोटींच्या योगदानाचं काय करणार?

आपल्या भविष्यातील योजना मांडताना, आयआयटी मुंबईने पुढील पाच वर्षांत 4 हजार 106 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचं सांगितलं. नीलेकणी यांनी दिलेली देणगी एक मदत म्हणून काम करेल आणि संस्थेला निर्धारित उद्दिष्टं साध्य करण्यासाठी योजना सुरू करण्यास मदत करेल, आयआयटी मुंबईने स्पष्ट केलं आहे.

योगदान देताना काय म्हणाले नीलेकणी?

"आयआयटी-बॉम्बे माझ्या आयुष्यातील एक आधारशिला आहे, ज्याने माझ्या सुरुवातीच्या वर्षांना आकार दिला आहे आणि माझ्या प्रवासाचा पाया रचला आहे. मी या प्रतिष्ठित संस्थेशी माझ्या सहवासाची 50 वर्षे साजरी करत असताना, मी आयआयटीच्या भविष्यासाठी योगदान दिल्याबद्दल कृतज्ञ आहे," असं नंदन नीलेकणी यांनी म्हटलं आहे.

"ही देणगी केवळ आर्थिक योगदान नाही, तर आर्थिक योगदानापेक्षाही अधिक आहे; ज्या संस्थेने मला खूप काही दिलं त्या संस्थेप्रती हे फक्त एक ऋण आहे आणि उद्याचे आपले जग घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेली वचनबद्धता आहे," असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
×
Embed widget