एक्स्प्लोर

दिलीप छाब्रियांच्या 'कार' नाम्याचा पर्दाफाश

प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : भारताची पहिली स्पोर्ट्स कार DC AVANTI गाडी घोटाळा पोलिसांनी उघड केला आहे. DC डिझाईन्सचे मालक दिलीप छाबरीया यांना अटक करण्यात आली आहे.. मुंबई पोलिसांच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटचे पोलीस अधिकारी सचिन वझे यांना माहिती मिळाली होती की नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलजवळ डी सी अवंती गाडी येणार आहे. ज्या गाडीचा नंबर हा बोगस आहे. या माहितीच्या आधारे सचिन वझे आणि त्यांच्या टीमने 17 डिसेंबर रोजी सापळा रचला. मात्र त्या दिवशी गाडी आली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 डिसेंबरला ताज हॉटेल कुलाबा या ठिकाणी पुन्हा सापळा रचण्यात आला आणि त्या दिवशी गाडी आली. गाडी ताब्यात घेऊन जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा हादरून टाकणारी माहिती पोलिसांच्या हाती लागली.

गाडी चालवत असलेल्या मालकाची जेव्हा विचारपूस पोलीसांकडून केल्यानंतर गाडी मालकाने गाडीचे पेपर पोलिसांना दिले जे खरे होते. चेन्नईच्या पत्त्यावर रजिस्टर होते. मात्र पुढील तपासात असे निदर्शनास आले की, त्याच चेसिस आणि इंजीन नंबरवर दुसरी गाडी हरियाणामध्ये रजिस्टर करण्यात आली आहे.

डी सी अवंती गाडी ही दिलीप छाबरिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून बनवण्यात आली होती. 2016 मध्ये या गाडीची लॉन्चिंग करण्यात आले होते. 2015 मध्ये ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांचं क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या गाडीची लॉन्चिंग करण्यात आली होती. दिलीप छाबरिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 14 जून 1993 मध्ये झाली होती. पुण्यात असलेल्या दिलीप छाबरिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्लांट येथे डीसी अवंती कार बनवल्या जात होत्या.

प्राथमिक तपासामध्ये पोलिसांच्या हाती अतिशय महत्त्वाची माहिती लागली. 120 डीसी अवंती गाड्या या भारतात आणि भारताच्या बाहेर विकल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये एका गाडीची किंमत अंदाजे 42 लाख रुपये आहे. एका गाडीवर एका फायनान्स कंपनीपेक्षा अधिक फायनान्स कंपन्यांकडून लोन घेण्यात आलं आहे. तसेच दिलीप छाबरिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वतः बनवलेल्या गाड्या स्वतः विकत घेतल्या आहेत. 90 गाड्यांवर एक पेक्षा जास्त फायनान्स कंपनी कडून लोन घेण्यात आले आहे.

यामुळे सरकारच्या महसुलाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शंका आहे. कस्टम ड्युटी, जीएसटी अशाप्रकारचे काही कार या कंपनीकडून चढवण्यात आले आहेत का आणि त्यांचं प्रमाण किती आहे याचाही तपास क्राइम ब्रांच कडून केले जात आहे.

भारताची पहिली स्पोर्ट्स कार म्हणून प्रसिद्ध असलेली डी सी अवंती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी सुद्धा भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांनी चेन्नई येथील कंज्यूमर कोर्टात दिलीप छाब्रिया यांच्याविरोधात धाव घेतली होती. दिनेश कार्तिक यांनी डी सी अवंती कार बूक केली होती मात्र गाडीची डिलिव्हरी वेळेत मिळाली नाही. दिनेश कार्तिक यांनी आगाऊ भरलेले पाच लाख रुपये रक्कम सुद्धा परत मिळाली नाही ज्यामुळे त्याने कंज्युमर कोर्टात धाव घेतली होती.

2018 मध्ये दिलीप छाबरिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वता:च्या कंपनीला दिवाळखोरी घोषित करण्याची तयारी सुद्धा केली होती. दिलीप छाबरीया यांना 28 डिसेंबरला एमआयडीसी अंधेरी येथून अटक करण्यात आली. जॉईंट पोलीस कमिशनर क्राईम मिलिंद भारंबे, ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस वीरेश प्रभू, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस अकबर पठाण, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस शशांक सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल इंटेलिजन्स युनिट चे अधिकारी सचिन वझे यांच्या निदर्शनात प्रकाश होवळ, रियाजुद्दीन काजी, कीर्ती माने, आतिश लोहकरे या पथका कडुन करण्यात आली.

Dilip Chhabria Arrest | सापळा रचून दिलीप छाब्रीयांना अटक; कारवाईची दृश्य 'माझा'च्या हाती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special ReportSuresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special ReportSuresh Dhas VS Dhananjay Munde| धनंजय मुंडे विरूद्ध सुरेश धस वादाचा इतिहास काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.