एक्स्प्लोर
Advertisement
निवडणुकीतील पैशाच्या देवाणघेवाणीवर आयकर खात्याची करडी नजर
मुंबई : आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशाच्या देवाणघेवाणीवर निवडणूक आयोग लक्ष ठेवून असेल. निवडणुकीवेळी होणाऱ्या काळ्या पैशाच्या देवाणघेवाणीवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोग आयकर अधिकारी आणि बँकांची मदत घेणार आहे.
पुढील महिन्यात राज्यात 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पैशांचे गैरव्यवहार होऊ नये, तसंच कॅश फ्लोवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग आयकर खात्याचे अधिकारी आणि खासगी बँकांची मदत घेणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य विनिमय नियामक मंडळाची (State expenditure monitoring committee) स्थापना केली जाणार आहे. यात आयकर विभागाच्या 12 अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
तसंच खासगी बँकांनाही संशयित ट्रान्झक्शन्स, पैसे काढणे, डिपॉझिटवर लक्ष ठेवून त्याची माहिती देण्यास सांगितलं आहे. कमिटी याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाला माहिती कळवणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement