Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकमध्ये कोणतीही योजना बंद केलेली नाही. त्यामुळे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गॅरंटी कार्ड जाहीर केलं असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी टोला लगावला.
Anjali Nimbalkar on Mahayuti : कर्नाटकमध्ये सरकार स्थापन होताच आम्ही पाच योजना जाहीर केल्या होत्या. त्या योजना पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजुरी देत महिलांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात येत आहेत, कर्नाटकात शक्ती योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आम्ही कर्नाटकमध्ये कोणतीही योजना बंद केलेली नाही, अशा शब्दात कर्नाटकातील काँग्रेस नेत्या आणि कोल्हापूरच्या सून असलेल्या डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी महायुती सरकारला टोला लगावला.
महाराष्ट्रात महायुती सरकारला लोक कंटाळली आहेत
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमधील शक्ती योजनेवरून भाजप नेत्यांसह पंतप्रधान मोदींकडूनही टीका करण्यात येत आहे. मात्र, अंजली निंबाळकर यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना भाजप आणि महायुतीकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. कर्नाटकमध्ये सर्व योजना सुरु असल्याचे सांगितले. निंबाळकर यांनी सांगितले की कर्नाटकमध्ये मराठा समाजाला आधार देण्याचं काम निश्चितपणे सुरू आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारला लोक कंटाळली आहेत. त्यामुळे कधी जात, कधी धर्म अशा पद्धतीने राजकारण सुरू आहे असल्याची टीका त्यांनी केली. शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले हे लोकशाहीसाठी चांगला असल्याचे अंजनी निंबाळकर म्हणाल्या.
त्यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये आम्ही पाच योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे त्या योजना पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजूर करून महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये कोणतीही योजना बंद केलेली नाही. त्यामुळे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गॅरंटी कार्ड जाहीर केलं असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी टोला लगावला. त्या म्हणाल्या की लाडकी बहीण बरोबर लाडकी बायको, लाडकी आई सुद्धा असली पाहिजे.
यांच्याकडून केवळ अदानी, अंबानी यांचे घर भरण्याचं काम
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना जी गरज आहे त्या योजना गॅरंटी कार्डच्या माध्यमातून देत असल्याचे अंजन निंबाळकर म्हणाल्या. यांच्याकडून केवळ अदानी, अंबानी यांचे घर भरण्याचं काम होत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. गरिबांना गरीब ठेवण्याचे महायुतीच्या सरकारमध्ये झालं असून 23 तारखेला निश्चित महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, यामध्ये शंका नसल्याचा विश्वास सुद्धा अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या