एक्स्प्लोर

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मुंबईचा क्रमांक घसरला, नवी मुंबई शहर पहिल्या दहामध्ये, स्वच्छ रँकिंगमध्ये राज्यातील 24 शहरे

स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहर 7 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात मुंबईचा क्रमांक 18 वा होता. तसंच, राज्यांच्या राजधान्यांच्या गटात मुंबई प्रथम क्रमांकावर होती. यंदा मात्र मुंबईचा क्रमांक घसरला आहे.

मुंबई :  स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मुंबईचा क्रमांक घसरला आहे.  500 शहरांपैकी मुंबईचा क्रमांक 18 वरुन 49 व्या स्थानावर घसरला आहे. तर नवी मुंबई शहराला पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले आहे.  स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहर 7 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात मुंबईचा क्रमांक 18 वा होता. तसंच, राज्यांच्या राजधान्यांच्या गटात मुंबई प्रथम क्रमांकावर होती. यंदा मात्र मुंबईचा क्रमांक घसरला आहे. मुंबईचा क्रमांक घसरण्याची कारणे  1)  स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत मोठ्या शहरात नागरिकांकडून कचरा उचलण्याचे शुल्क म्हणजेच घनकचरा व्यवस्थापन अधिभार वसूल करण्याचे निर्देश होते, मात्र मुंबई महापालिका आयुक्तांनी असे शुल्क मुंबईकरांकडून आपण आकारणार नसल्याचे सांगितले. यामुळे, मुंबईला या स्पर्धेत 3 स्टार सिटीचा दर्जा मिळू शकला नाही. 2) सर्वेक्षणाअंतर्गत मुंबईकरांनी मुंबईतील स्वच्छतेसंदर्भात नकारात्मक मतदान केले. या नकारात्मक मतदानामुळे मुंबईचे गुण कमी झाले. 200 गुणांपैकी मतदानाचे 800 गुण मुंबईला मिळाले. तर गेल्यावर्षी 1400 पैकी 1200 गुण मुंबईकरांच्या सकारात्मक  मतदानामुळे मिळाले होते.   3) मुंबईत 100 टक्के मलनि:स्सारण, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचं जाळं नाही. 4) मुंबई डंपिंग ग्राऊंड मुक्त शहर नाही. 5) कचरा वर्गीकरण प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात नाही. 6) मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो अशा ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे तंत्र अवलंबले जात नाही. व्हिडीओ :   सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून महाराष्ट्र देशात अव्वल ‘स्वच्छ सर्वेक्षण -2019’ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर स्वच्छ सर्वेक्षणात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा  तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला  मिळाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 27 शहरे कचरा मुक्त ठरली आहेत. यामध्ये मूल, वैजापूर, वसई विरार, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, मंगळवेढा, महाबळेश्वर, पाचगणी, कऱ्हाड, रत्नागिरी, मलकापूर, पन्हाळा, वडगाव, कोल्हापूर, गडहिंग्लज, विटा, तासगाव, कोरेगाव या शहरांचा समावेश आहे. कचरा मुक्तीसाठी या शहरांना ‘थ्री स्टार’ दर्जा देण्यात आला आहे. या सर्व शहरांना केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कराड शहराला स्वच्छ शहराचा पुरस्कार स्वच्छ सर्वेक्षणातील पश्चिम विभागात एकूण 19 पुरस्कार देण्यात आले यापैकी 13 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. यामध्ये कराड, लोणावळा, मूल, उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई, खोपोली, विटा, देवळाली-प्रवरा, इंदापूर, पोंभूर्णा, मौदा सीटी या शहरांचा समावेश आहे. एक लाख लोखसंख्या असलेल्या शहरामधून सातारा जिल्हयातील कराड, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या शहरांना स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई व खोपोली या शहरांना स्वच्छ शहरांचा पुरस्कार मिळाला आहे. 25 ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या वीटा, देवळाली-प्रवरा व इंदापूर या शहरांनाही स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे तर 25 हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पोंभूर्णा, मौदा, मलकापूर या शहरांनाही पश्चिम विभागतून स्वच्छ शहरांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागरिक प्रतिसादामध्ये नवी मुंबईला पुरस्कार 10 लाखा पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील शहरांमध्ये नवी मुंबई शहराला स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या उत्त्म प्रतिसादाबद्दल पुरस्कृत करण्यात आले. 3 ते 10 लोकसंख्या असलेल्या शहरांमधून नागरिक प्रतिसादासाठी चंद्रपूर शहराला गौरविण्यात आले, तर घन कचरा व्यवस्थापनात केलेल्या उल्लेखनीय कार्यायाठी  लातूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला. पन्हाळा स्वच्छ सर्वेक्षणात देशात 17 व्या स्थानी स्वच्छ सर्वेक्षणात नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानी शहरांसाठी असलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार बृन्हमुंबईला शहराला देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा या शहराला देशातील 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत 17 वा क्रमांक मिळाला आहे. देशातील पाच शहरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये राजकोट, भिलाई नगर, विजयवाडा व गाजियाबाद या शहरांचा समावेश आहे. अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डास उत्तम स्वच्छ कॅन्टोनमेंट पुरस्कार देण्यात आला आहे. स्वच्छ रॅकिंगमध्ये पहिल्या शंभरात राज्यातील 24 शहरे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील 423 शहरांची रॅकिंग जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या 100 शहरांत महाराष्ट्रातील 24 शहरांचा समावेश आहे. या शहरामध्ये नवी मुंबई (7), कोल्हापूर (16), मीरा-भाईंदर (27), चंद्रपूर (29), वर्धा (34), वसई-विरार (36), पुणे (37), लातूर (38), सातारा (45), पिंपरी-चिंचवड(52), उदगीर (53), सेालापूर (54), बार्शी (55), ठाणे (57), नागपूर (58), नांदेड-वाघाळा (60), नाशिक (67), अमरावती (74), जळगाव (76), कल्याण-डोबिंवली (77), पनवेल (86), अचलपूर (89),बीड (94) व यवतमाळ (96) या शहरांचा समावेश आहे. घन कचरा व्यवस्थापनात राज्यातील चार शहरे घन कचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रातील चार शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये लातूर, खोपोली, इंदापूर व मलकापूर या शहरांचा समावेश आहे.  स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद मिळविण्यात प्रभावी कार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातील नवी मुंबई, चंद्रपूर, उमरेड व पोंभूर्णा या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Kedar Vs Aashish Jaiswal : जैस्वालांना धडा शिकवण्यासाठी बंडखोरी - केदारABP Majha Headlines :  12 PM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :14 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Embed widget