(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेल्या बॅनरवर खून, मारामाऱ्या, विनयभंग प्रकरणातील अट्टल 'भास्कर' प्रकटला! कोल्हापूर पोलिस नेमक्या कोणत्या गुंगीत?
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात खून, मारामारी, खंडणी, अपहरण, विनयभंग, सावकारी प्रकरणतील अट्टल सराईत गुंड अमोल भास्कर मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर झळकल्याने संतापाचा कडेलोट झाला आहे.
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात खून, मारामारी, खंडणी, अपहरण, विनयभंग, सावकारी प्रकरणतील अट्टल सराईत गुंड अमोल भास्कर मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर झळकल्याने संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोल्हापुरातील प्रमुख नेते राजेश क्षीरसागर यांना24 नोव्हेंबरला वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी शहरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर अट्टल भास्कर प्रकट झाल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या.
अमोल भास्करचे उमा टाॅकिज चौक तसेच ताराराणी चौकात फलक झळकले आहेत. बॅनरवर राजेश क्षीरसागर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आनंद दिघे यांचाही फोटो आहे. त्यामुळे भुरट्या गुंडांनी आपली प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी अशा मार्गाचा अवलंब करत आहेत का? असाही प्रश्न निर्माण होतो. एक सराईत गुंड गावभर पोस्टर लावून फिरत असताना कोल्हापूर पोलिस नेमक्या कोणत्या गुंगीत होते? अशी विचारणा आता होऊ लागली आहे.
भुरट्या गुंडांची मर्दुमकी वाढली, पोलिस नेमक्या कोणत्या गुंगीत?
गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर शहर परिसरात मिशाही न फुटलेल्या भुरट्या गुडांची वाढत चाललेली मर्दुमकी, मोठ्या बापाच्या बिघडलेल्या दिवट्या पोरांचा खुलेआम 'दम मारो दम', दोन सराईत गुंडांची झालेली निर्घृण हत्या, हातकणंगले तालुक्यात दारुअड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी गेल्यानंतर गुडांनी पोलिसांवरच केलेला हल्ला पाहता कोल्हापूरमध्ये पोलिसांचा वचक संपत चालला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुरट्यांची कुंडली समोर असताना पोलिस बघ्याची भूमिका का घेत आहेत? असाही प्रश्न निर्माण होतो. इचलकरंजीमधील सराईत गुंड अजित नाईकची जामीनावर सुटका झाल्यानंतर काढलेली वरात त्याचेच द्योतक आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
राजकीय नेत्यांवर असभ्य भाषेत शेरेबाजी करणाऱ्यांना शोधून काढून कारवाई केली जात असतानाच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या भुरट्यांच्या नाड्या आवळण्यात पोलिसांना नेमकी कोणती अडचण होत आहे? असाही प्रश्न निर्माण होतो. सोशल मीडियातून व्हिडिओ, रिल्स करून एकमेकांना धमकी देण्याचे तसेच आपण गल्लीत श्रेष्ठ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न या सडक छाप गुंडांकडून आणि बिघडलेल्या दिवट्या पोरांकडून केला जात आहे. वचक निर्माण करण्यासाठी सुद्धा असे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियात देण्यात येणारी धमकी आता रस्त्यावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे या टोळीयुद्धाचा भडका होण्याअगोदर नाड्या आवळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या