एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेल्या बॅनरवर खून, मारामाऱ्या, विनयभंग प्रकरणातील अट्टल 'भास्कर' प्रकटला! कोल्हापूर पोलिस नेमक्या कोणत्या गुंगीत? 

Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात खून, मारामारी, खंडणी, अपहरण, विनयभंग, सावकारी प्रकरणतील अट्टल सराईत गुंड अमोल भास्कर मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर झळकल्याने संतापाचा कडेलोट झाला आहे.

Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात खून, मारामारी, खंडणी, अपहरण, विनयभंग, सावकारी प्रकरणतील अट्टल सराईत गुंड अमोल भास्कर मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर झळकल्याने संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोल्हापुरातील प्रमुख नेते राजेश क्षीरसागर यांना24 नोव्हेंबरला वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी शहरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर अट्टल भास्कर प्रकट झाल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या.

अमोल भास्करचे उमा टाॅकिज चौक तसेच ताराराणी चौकात फलक झळकले आहेत. बॅनरवर राजेश क्षीरसागर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आनंद दिघे यांचाही फोटो आहे. त्यामुळे भुरट्या गुंडांनी आपली प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी अशा मार्गाचा अवलंब करत आहेत का? असाही प्रश्न निर्माण होतो. एक सराईत गुंड गावभर पोस्टर लावून फिरत असताना कोल्हापूर पोलिस नेमक्या कोणत्या गुंगीत होते? अशी विचारणा आता होऊ लागली आहे.  

भुरट्या गुंडांची मर्दुमकी वाढली, पोलिस नेमक्या कोणत्या गुंगीत?

 गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर शहर परिसरात मिशाही न फुटलेल्या भुरट्या गुडांची वाढत चाललेली मर्दुमकी, मोठ्या बापाच्या बिघडलेल्या दिवट्या पोरांचा खुलेआम 'दम मारो दम', दोन सराईत गुंडांची झालेली निर्घृण हत्या, हातकणंगले तालुक्यात दारुअड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी गेल्यानंतर गुडांनी पोलिसांवरच केलेला हल्ला पाहता कोल्हापूरमध्ये पोलिसांचा वचक संपत चालला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुरट्यांची कुंडली समोर असताना पोलिस बघ्याची भूमिका का घेत आहेत? असाही प्रश्न निर्माण होतो. इचलकरंजीमधील सराईत गुंड अजित नाईकची जामीनावर सुटका झाल्यानंतर काढलेली वरात त्याचेच द्योतक आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

राजकीय नेत्यांवर असभ्य भाषेत शेरेबाजी करणाऱ्यांना शोधून काढून कारवाई केली जात असतानाच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या भुरट्यांच्या नाड्या आवळण्यात पोलिसांना नेमकी कोणती अडचण होत आहे? असाही प्रश्न निर्माण होतो. सोशल मीडियातून व्हिडिओ, रिल्स करून एकमेकांना धमकी देण्याचे तसेच आपण गल्लीत श्रेष्ठ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न या सडक छाप गुंडांकडून आणि बिघडलेल्या दिवट्या पोरांकडून केला जात आहे. वचक निर्माण करण्यासाठी सुद्धा असे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियात देण्यात येणारी धमकी आता रस्त्यावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे या टोळीयुद्धाचा भडका होण्याअगोदर नाड्या आवळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget