Monsoon Updates : राज्यातील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता, काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी
Rain Updates : देशासह राज्यभरात सोमवारी रात्रीपासून चांगली हजेरी लावली आहे. देशभरात अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rain Updates : दडी मारुन बसलेला पाऊस जून महिना संपताना महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गेले काही दिवस पावसाची रिपरिप सुरु आहे. मंगळवारी रात्री मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळला.
राज्यातील इतर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावासामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याकडून पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Severe weather warning areas for next 5 days :
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 21, 2022
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/RtbdqrQ1zg
उत्तर भारतातही पावसाची चाहूल
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची चाहूल लागली आहे. स्कायमेट वेदरचे अध्यक्ष (हवामानशास्त्र) जीपी शर्मा यांनी सोमवारी माहिती दिली की येत्या दोन ते तीन दिवसांत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि बांगलादेश लगतच्या भागात चक्रीवादळ तयार होईल. त्यानंतर 27 जूनपर्यंत मान्सून दिल्लीत पोहोचेल.
पश्चिम बंगालमध्ये पाच दिवस मुसळधार पाऊस
हवामान विभागाकडून पश्चिम बंगालमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दार्जिलिंग, कालिम्पॉन्ग, जलपाईगुडी, कूचबिहार आणि अलीपुरद्वार आणि सिक्कीम या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्यानुसार बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दक्षिण आणि नैऋत्य वाऱ्यांच्या परिणामामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या