Viral Video : अर्र हे काय चाललंय... अभ्यासाचा इतका राग राग! लेकरांचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही डोक्यावर हात माराल...
Viral Video : सोशल मीडियावर काही चिमुरड्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलं शाळेचं दप्तर चिखलात फेकताना दिसत आहेत.
![Viral Video : अर्र हे काय चाललंय... अभ्यासाचा इतका राग राग! लेकरांचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही डोक्यावर हात माराल... children throwing school bags in mud video viral see here Viral Video : अर्र हे काय चाललंय... अभ्यासाचा इतका राग राग! लेकरांचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही डोक्यावर हात माराल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/0b8395981694bdec692c941675a539e5_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Trending Video : प्रत्येक व्यक्तीसाठी आपलं बालपण खास असतं. बालपणाच्या काही आठवणी आणि किस्से यांच्यासाठी मनात वेगळं स्थान असतं. लहानपणी बहुतेक सर्वच जण मस्तीखोर असतात. लहान वयात मुलांना खेळण्याची आवड असते आणि अभ्यासाचा कंटाळा. अभ्यास म्हटलं की लहान मुलांच्या कपाळावर आठ्या पडतात. अभ्यास करणं म्हणजे लहान मुलांसाठी आव्हान असतं. मुलांना अभ्यासाचा खूपच कंटाळा येतो.
सध्या अशाच काही चिमुरड्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या लहान मुलांना अभ्यासाचा इतका राग आणि कंटाळा आला आहे की, त्यांनी चक्क शाळेची दप्तरतं चिखलात फेकली. एका मागोमाग एक सर्व लहान मुलांनी समोरच असणाऱ्या चिखलाने भरलेल्या खड्ड्यात रागाने दप्तर फेकली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आता या चिुरड्यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्हीही पाहा.
View this post on Instagram
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या लेकरांवर अभ्यासाचं किती टेन्शन आहे. अभ्यासामुळे मुलं इतकी कंटाळली आहेत की त्यांना राग अनावर झाला आहे. चिमुकल्यांनी त्यांचा हा राग वह्या-पुस्तके (Books) आणि दप्तरावर (School Bag) काढला आहे. व्हिडीओमध्ये लहान मुलं फार रागात दिसत आहेत. ते आवेशामध्ये त्यांची शाळेची बॅग चिखलामध्ये फेकत आणि लोळवत आहेत.
इंस्टाग्रामवर novaic नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सात दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 13 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)