राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, राजेंद्र भोसले मुंबई उपनगरचे नवे जिल्हाधिकारी, तर दिपा मुधोळ-मुंडे यांची बीडला बदली
IAS Transfer: मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
![राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, राजेंद्र भोसले मुंबई उपनगरचे नवे जिल्हाधिकारी, तर दिपा मुधोळ-मुंडे यांची बीडला बदली IAS officers Transfer Rajendra Bhosale new collector of Mumbai suburbs Deepa Mudhol Munde Nidhi Choudhari transferd राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, राजेंद्र भोसले मुंबई उपनगरचे नवे जिल्हाधिकारी, तर दिपा मुधोळ-मुंडे यांची बीडला बदली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/d9f7afa30fbc245efe25caa681f8cb95_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या (IAS officers Transfer) असून राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale ) यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी (Nidhi Choudhari) यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच दिपा मुधोळ-मुंडे (Deepa Mudhol Munde) यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
IAS Transfer: या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या
1. राजेंद्र भोसले, IAS (2008), या आधी अहमदनगरचे जिल्हाधिकारी, आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
2. दिपा मुधोळ मुंडे, IAS (2011) या आधी औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासक, आता बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
3. राधाविनोद शर्मा, IAS (2011) या आधी बीडचे जिल्हाधिकारी, आता औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती.
4 सिद्धार्थ सालीमथ, IAS (2011) अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
5 निधी चौधरी, IAS (2012) या आधी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी, आता मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी नियुक्ती.
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली, दीपा मुधोळ- मुंडे नविन जिल्हाधिकारी
बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांची अखेर बदली करण्यात आली असून बीडला जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे (Deepa Mudhol Munde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आता अखेर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली आहे. दीपा मुधोळ मुंडे या 2011 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे.
बीडमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला निरोप देताना गावकरी आणि कर्मचारी भावूक
काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका पोलीस निरीक्षकाला बदलीनंतर निरोप देताना कर्मचाऱ्यांसह गावकरी भावूक झाल्याचं दिसलं. बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांची बदली झाली. प्रदीप एकशिंगे यांनी शिरसाळा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना गुन्हेगारी रोखण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती. त्यामुळे नागरिकांनी इतर कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या आपुलकीचे संबंध निर्माण झाले होते.आता त्यांची बदली झाल्यानंतर कर्मचारी आणि गावकऱ्यांनी त्यांचा निरोप समारंभाच्या कार्यक्रमात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोप दिला आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)