एक्स्प्लोर
पंकजा ताईंसोबत गडावर जाणार, भाषणही होणार : महादेव जानकर
भगवानगड दसरा मेळाव्याचा वाद अजूनही कायम आहे. मात्र दसऱ्याला गडावर जाऊ, भाषणही करु, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे
अहमदनगर : ''वाद हे होतच असतात, आम्ही सामान्य समाजाचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे यावर्षीही पंकजाताईंसोबत भगवानगडावर जाऊन दर्शन घेणार'', असं पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
भगवानगड दसरा मेळाव्याचा वाद अजूनही कायम आहे. दसरा मेळावा होईल की नाही, याबाबतही अजून संभ्रम आहे. मात्र दसऱ्याला गडावर जाऊ, भाषणही करु, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
दुसरीकडे दसरा मेळाव्याबाबत संभ्रमात असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तर दसरा मेळावा घेण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक आक्रमक आहेत. विविध ठिकाणी पंकजा मुंडेंना भेटून दसरा मेळावा घेण्यासाठी निवेदन दिलं जात आहे.
भगवानगड दसरा मेळावा वाद काय आहे?
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यात समर्थकांना संबोधित करायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली. मात्र गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर दसरा मेळावा यापुढे होणार नाही, अशी भूमिका गेल्या वर्षीपासून घेतली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेनंतर पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी समर्थकांना संबोधित केलं. यावर्षीही हा वाद कायम आहे.
एकीकडे मुंडे समर्थक दसरा मेळाव्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे गडाचे महंत नामदेव शास्त्री त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर्षी गडावर दसऱ्याला कोणत्याही व्हीव्हीआयपीला परवानगी देण्यात येऊ नये, असं पत्र नामदेव शास्त्रींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :
भगवानगड दसरा मेळाव्याबाबत पंकजा मुंडे अजूनही संभ्रमात!
भगवानगड दसरा मेळावा ही लोकभावना : पंकजा मुंडे
दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे-नामदेव शास्त्री आमने-सामने येणार?
भगवानगड वाद : पंकजा मुंडेंची माघार म्हणजे राजकीय खेळी : नामदेव शास्त्री
पंकजांनी गडावर यावं, माहेरचे दोन घास खावेत : नामदेव शास्त्री
भगवान बाबांच्या आजोळी नामदेव शास्त्रींना बंदी
EXCLUSIVE: नामदेव शास्त्रींसोबत कोणताही वाद नाहीः पंकजा मुंडे
नामदेव शास्त्रींची आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल
नामदेव शास्त्री आणि पत्रकारातील संभाषण जसेच्या तसे
एखाद्याला फाडून खाईन इतकी ताकद आहे माझीः नामदेव शास्त्री
भगवान गड वादः नामदेव शास्त्रींचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
महंत नामदेव शास्त्रींवर जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement