Satej Patil : मी माझ्या मामाच्या गावाला एसटीनेच जायचो; सतेज पाटलांकडून संभाजीनगर बस स्थानकाची पाहणी करताना आठवणींना उजाळा
माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी आज संभाजीनगर बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी सतेज पाटील यांनी आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला.
Satej Patil : कोल्हापूरमधील महत्त्वाच्या बसस्थानकांपैकी एक संभाजीनगर बसस्थानक कात टाकत आहे. तब्बल 9 कोटी 80 लाख खर्च करून बस स्थानकाची देखणी इमारत उभी राहणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी आज संभाजीनगर बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी सतेज पाटील यांनी आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या संभाजीनगर बस स्थानकाची पहिली झलकही सादर केली.
सतेज पाटील सुरु असलेल्या कामाची पाहणी करून कामाचा दर्जा उत्तम ठेवण्याच्या सूचना केल्या. संभाजीनगर बसस्थानकात पुरेशी जागा असल्याने तसेच रंकाळा आणि सीबीएसचा विचार करता हा परिसर मोठा आहे. त्यामुळे संभाजीनगर बसस्थानकाचे लोकार्पण झाल्यानंतर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. बसस्थानकासाठी 9 कोटी 80 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या बसस्थानकात मॉल आणि मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मी माझ्या मामाच्या गावाला एसटीनेच जायचो
बसस्थानकात सुरु असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर सतेज पाटील बालपणीच्या आठवणीत रमले. त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सतेज पाटील म्हणाले की, ट्रॅव्हल्स वैगेरे आता आल्या, पण सहलीला देखील एसटीने गेलो.
सीबीएसवरील ताण कमी होणार
सीबीएस आणि रंकाळा बसस्थानकाच्या जागेच्या तुलनेत संभाजीनगर बसस्थानकाचा १२ एकराचा आहे. यात डेपो साडेतीन एकरात आहे. राज्यातील 13 बसस्थानकांच्या यादीत संभाजीनगरचा समावेश आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे दहा एकर जागेचा कायापालट होणार आहे. बसपोर्टमुळे सीबीएसवरील ताण कमी होणार असून आधुनिकीकरण होणार आहे. नवीन इमारतीसह परिसराचे सुशोभिकरण, पार्किंग, ड्रेनेज व्यवस्थेची कामे करण्यात येणार आहेत.
संभाजीनगर बसस्थानक पूर्ण झाल्यानंतर एसटीचा मार्गही सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे. गगनबावडा, गारगोटी, राधानगरी, निपाणी आणि बेळगाव या मार्गांवर थेट संभाजीनगरातून स्वतंत्र एसटीची सोय शक्य आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर आणि रंकाळा ही तीन आगार आहेत. त्यातून दररोज 65 हजारांवर प्रवाशांची वाहतूक केली जाते.
कसं असेल संभाजीनगर बसस्थानक?
- 9 कोटी 80 लाख खर्च करून बांधलं जाणार बस स्थानक
- कामाचा दर्जा उत्तम ठेवण्याच्या सतेज पाटील यांच्याकडून सूचना
- बस स्थानकात मॉल आणि मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार
इतर महत्वाच्या बातम्या