एक्स्प्लोर
Advertisement
निमंत्रण नसल्याने राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेलो नाही : राणे
गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणेंची भाजपशी जवळीक वाढली आहे. मात्र खुद्द पक्षाचे उपाध्यक्ष राज्यात असतानाही राणेंची गैरहजेरी चर्चेचा विषय बनला आहे.
सिंधुदुर्ग : निमंत्रण नसल्याने मराठवाड्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेलो नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलं आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. परंतु महाराष्ट्रातील पक्षाचे नेते नारायण राणे मात्र राहुल गांधींच्या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत.
याविषयी विचारलं असता नारायण राणे म्हणाले की, "या कार्यक्रमाला नांदेड, मराठवाड्याचे कार्यकर्ते होते. आजचा कार्यक्रम आमच्या क्षेत्रात नव्हता. मुंबई-पुण्यात कार्यक्रम असता तर गेलो असतो. तिथल्या नेत्यांनी मला आमंत्रित केलं नव्हतं."
शिवाय आजची बैठक पूर्वनियोजित होती. त्यामुळे आपण जाणं गरजेचं नसल्याचं राणेंनी सांगितलं.
गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणेंची भाजपशी जवळीक वाढली आहे. मात्र खुद्द पक्षाचे उपाध्यक्ष राज्यात असतानाही राणेंची गैरहजेरी चर्चेचा विषय बनला आहे.
संबंधित बातम्या
राहुल गांधी नांदेडात, मात्र नारायण राणे कोकणातच
महाराष्ट्रात 35 नव्हे तर केवळ 5 हजार कोटींचीच कर्जमाफी: राहुल गांधी
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
राजकारण
राजकारण
Advertisement