Raj Thackeray: मी उत्तर प्रदेशचा, महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते? 26/11च्या हल्ल्यात 150 नागरिकांचा जीव वाचवणाऱ्या माजी सैनिकाचा राज ठाकरेंना प्रश्न
Raj Thackeray: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. दरम्यान, कमांडो फोर्सच्या एका माजी सैनिकाने राज ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. त्यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात तुमचे योद्धे कुठे होते? असं म्हटलं आहे.

Raj Thackeray: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. दरम्यान, एका माजी कमांडो फोर्स सैनिकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी विचारले आहे की, मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी तुमचे योद्धे कुठे होते? या सैनिकाचे नाव प्रवीण कुमार तेवतिया आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात प्रवीणने अनेक लोकांचे प्राण वाचवले होते. ताज हॉटेलमधील 150 लोकांना वाचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता या सैनिकाने राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे की मी उत्तर प्रदेशचा आहे. मी महाराष्ट्रासाठी माझे रक्त सांडले आहे. भाषेच्या नावाखाली देशाचे विभाजन करू नका, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
फोटो देखील पोस्ट केलेला
प्रवीण कुमार तेवतिया हे मरीन कमांडो फोर्स (मार्कोस) मध्ये होते. तेवतिया यांनी स्वतःचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. यामध्ये ते गणवेश परिधान करून हसत आहेत. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर यूपी लिहिलेले आहे आणि त्यांच्यी हातात रायफल देखील आहे. तेवतिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, '26/11 च्या हल्ल्यात मी मुंबई वाचवली. मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे.' त्यांनी पुढे लिहिले की, "मी ताज हॉटेल वाचवले. त्यावेळी राज ठाकरेंचे हे तथाकथित योद्धे कुठे होते? देशाचे विभाजन करू नका. हास्याला भाषा नसते''.
150 लोकांना वाचवण्यात आले
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान प्रवीण कुमार यांनी त्यांच्या पथकाचे नेतृत्व केले. या काळात त्यांची पथक ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या मोहिमेत होते. या कारवाईदरम्यान प्रवीण यांना अनेक जखमा झाल्या. त्यांना चार गोळ्याही लागल्या. पण त्याच्या जलद कृतीमुळे किमान 150 लोकांचे प्राण वाचले.
राज ठाकरे काय म्हणाले
शनिवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त मेळावा घेतला. यादरम्यान दोघांनीही मराठी भाषेबाबत एकता दाखवली. दोघांनीही मराठी बोलण्याच्या गरजेबद्दल एकाच सुरात मिसळले.
I saved Mumbai on 26/11.
— Adv Praveen Kumar Teotia (@MarcosPraveen) July 5, 2025
I bleed for Maharashtra.
I'm from UP.
I saved the Taj Hotel.
Where were Raj Thakre's so Called Warriors?
Don't divide the Nation.
Smiles don't require any Language. https://t.co/z8MBcdcTAW pic.twitter.com/uZAhM4e6Zq






















