(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed : पत्नी आणि माहेरच्या लोकांकडून अपमान ; पतीची आत्महत्या
पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केल्याने पतीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील किट्टी आडगाव येथे घडली आहे.
Suicide : पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केल्याने आणि दाखल केलेली केस मागे न घेतल्याने व्यथित झालेल्या पतीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील किट्टी आडगाव येथे घडली आहे. अनिल उत्तम थोरात असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अनिल थोरात हा ऊसतोडीचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचे आणि पत्नीचे शुल्लक कारणावरुन सतत मतभेद होत असत. त्यामुळे पत्नीकडून अनिल याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्नी आणि तिच्या माहेरचे लोक सतत अनिलचा अपमान करत असत. शिवाय त्याच्यावर दाखल केलेली केस मागे न घेतल्याने अनिल थोरात व्यथित झाला होता. त्यामुळे शनिवारी दुपारी 12 वाजता आनिल याने घरात साडीने आडुला गळफास घेवून आत्महत्या केली असे अनिलची आई महानंदा उत्तम थोरात यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी अनिलची आई महानंदा यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजलगाव ग्रामिण पोलीस ठाण्यात अनिलची पत्नी छाया, पत्नीचा मामा विजू आत्माराम क्षीरसागर, चुलता भाऊ राहुल क्षीरसागर आणि सासू संगीता अंकुश भिसे या चौघांवर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- 'कहो ना प्यार है' लिहिणारे काळाच्या पडद्याआड, गीतकार अब्राहम अश्क यांचे कोरोनामुळे निधन
- Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा! नव्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या तिप्पट
- ओमायक्रॉनच्या संकटात 1300 महिलांची सुरक्षित प्रसूती; BMC कडून विशेष दक्षता
- Maharashtra School : राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य