एक्स्प्लोर

HSC Result 2024 : चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तरुणाने अखेर यश खेचून आणलं; अन् हिणवणाऱ्यांनीच अभिनंदनाचं बॅनर लावलं

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या एका तरुणाने घरची परिस्थिती सांभाळून अखेर बारावीची परीक्षेत एकहाती यश खेचून आणलं आहे.

Bhandara News भंडाराआयुष्याच्या प्रवासात लाख संकट येत असतात. मात्र, जे या संकटांवर मात करून ठामपणे उभे ठाकतात, विजयश्री अशाच्याच गळ्यात विजयाची माळ घालत असते. याचाच प्रत्यय आलाय तो भंडारा जिल्ह्यातील (Bhandara News) लाखांदूर येथे. चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या एका तरुणाने घरची परिस्थिती सांभाळून अखेर बारावीची परीक्षेत (Maharashtra Board 12th Result) एकहाती यश खेचून आणलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या या यशाचा सर्वाधिक आनंद हा त्याच्या चहाच्या टपरीवर येणाऱ्या ग्राहकांना झाला आहे. कारण, या तरुणाने बोलून दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला असून बारावीत 55 टक्के गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे त्याच्या अभिनंदनाच बॅनर या ग्राहकांनी त्यांचाच चहाच्या टपरीवर लावला असून ते सध्या सऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

हिणवणाऱ्यांनीच लावला अभिनंदनाचे बॅनर  

घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं आई-वडीलही मोलमजुरी करतात. त्यांना हातभार लावता यावा म्हणून बारावीचं शिक्षण घेणारा पंकज चहाटपरीवर काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. बारावीच्या परीक्षेच्या दरम्यानही त्यानं हे काम सोडलं नाही. अशा वेळेस चहा पिण्यासाठी येणारे प्रत्येक ग्राहक त्याला अबे पंक्या, अभ्यास करं, नाहीतर नापास होशील आणि हेच धंदे करशील म्हणून बोलत होते. मात्र, पंकजनं हे बोल मनावर घेतले आणि चहा दुकानावरील काम नं सोडता अभ्यासही केला आणि त्यानं चक्क 55 टक्के मार्क्स घेवून परीक्षा उत्तीर्ण केली. पंकजच्या यशानं जे टोचून बोलत होते, त्यांनीच आता पंकजच्या अभिनंदनाचा बॅनर लावून त्याचं अभिनंदन केले आहे.  

घरची परिस्थिती सांभाळून यशाला गवसणी 

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील तो रहिवाशी असलेला पंकज नरेश जेंगठे याच्या घरची परिस्थिती एकदम हलाखीची आहे. शिवाय त्याचे कुटुंब हे भूमिहीन आहे. त्यामुळं पंकजचे आई - वडील मोलमजुरी करतात. त्यांना आर्थिक मदत करता यावी आणि स्वतःच्या मिळकतीतून शिक्षण पूर्ण करता यावं, म्हणून पंकज हा स्वतः एका चहाच्या टपरीवर काम करून बारावीचं शिक्षण घेत होता. ही चहाची टपरी प्रसिद्ध आणि गावातील मुख्य चौकातील असल्यानं इथं गावातील प्रसिद्ध व्यावसायिक, राजकारणी, पत्रकार आणि पंचक्रोशीतील जनता येत असे. त्यामुळं पंकज सर्वांचा चाहता बनला होता. 

अन् पंक्या  12 वीच्या परीक्षेत पास झाला

बारावीच्या परीक्षा काळातही पंकज चहा टपरीवर काम करीत असल्यानं चहा पिण्यासाठी येणारा प्रत्येकजण त्याला 'अबे पंक्या, अभ्यास कर...कामाला येवू नकोस...नाहीतर नापास होशील आणि हेच काम करावं लागेल' असं टोचून आणि उपहासात्मकपणे  बोलत होते. पंकजनं लोकांच्या बोलण्याकडं लक्ष नं देता, नित्यनेमाने चहा टपरीवर काम करून परीक्षा दिली आणि पठ्ठ्यानं चक्क 55 टक्के मार्क्स घेवून बारावीची परीक्षा पास केली. पंकजला जे हीनवायचे त्यांनीचं आज  त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून शहरातील मुख्य वर्दळीच्या चौकात अभिनंदनाचा बॅनर लावला. पंकजची आणि त्याच्या बॅनरची सध्या केवळ लाखांदुरातचं नव्हे तर भंडारा जिल्ह्यात देखील चर्चा रंगली आहे. 

इतर महत्वाची बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget