HSC Result : बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
HSC Result 2022 Date : या वर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा उद्या निकाल लागणार आहे.
मुंबई: राज्यातील सर्व पालक आणि विद्यार्यथ्यांना उत्सुकता लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दु्पारी एक वाजता लागणार आहे. तशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, "महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.8 जून,2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल."
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.#HSC #results@CMOMaharashtra@MahaDGIPR pic.twitter.com/sZm0rCi3fo
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022
बारावीचा निकाल एबीपी माझावर
उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसंच 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यंदा बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे.
यंदा तुम्हाला एबीपी माझाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.
कुठे पाहाल निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच, मंगळवारी 07 जून 2022 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी वाजल्यापासून विद्यार्थ्यांना 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.