एक्स्प्लोर
HSC Maharesult 2019 : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, निकाल कुठे आणि कसा पाहाल?
बारावीचा बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
बोर्डाने फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती.
HSC Result 2019 | बारावी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार | पुणे | ABP Majha
मागच्या वर्षी बारावी बोर्डाचा निकाल 30 मे रोजी लागला होता. मात्र यंदा दोन दिवस आधीच बारावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या हाती मिळणार आहे.
दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात?
बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचाही निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र बोर्डाकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. निकालाआधी एक किंवा दोन दिवस आधीच निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
याठिकाणी पाहता येणार निकाल?
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharshtraeducation.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement