![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
परभणीत 'त्या' दिवशीच्या पावसाच्या तिन्ही नोंदी खऱ्या!, समितीचा अहवाल
11 जून रोजी परभणीत किती पाऊस झाला हे शोधण्यासाठी समिती जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठित केली होती. आयएमडी, महसूल आणि कृषी विद्यापीठाच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली होती.
![परभणीत 'त्या' दिवशीच्या पावसाच्या तिन्ही नोंदी खऱ्या!, समितीचा अहवाल how much rain in Parbhani Differences in numbers, committee Report परभणीत 'त्या' दिवशीच्या पावसाच्या तिन्ही नोंदी खऱ्या!, समितीचा अहवाल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/31173803/rain-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
11 जूनचा पाऊस हा मान्सून पूर्व पाऊस होता. मान्सूनपूर्व पाऊस असल्याने पावसाची तीव्रता कुठे कमी कुठे जास्त होती. आयएमडीची वेधशाळा जिथे होती तिथं ढग मोठ्या प्रमाणावर होते तिथं पाऊस जास्त झाला. कृषी विद्यापीठाच्या वेधशाळा परिसरात पाऊस कमी झाला. जिल्हा प्रशासनाचे पर्जन्यमापक हे चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आले होते. जमिनीऐवजी ते तहसील कार्यालयाच्या छतावर असल्याने तिथली नोंद कमी आली, असं समितीनं म्हटलं आहे.
या तिन्ही नोंदी प्रशासकीय कामकाजात ग्राह्य धरणार नाहीत. महावेध प्रणालीच्या स्कायमेटने दिलेली 165 मिमी पावसाची नोंद ग्राह्य धरली जाणार आहे. जिल्हाभरातील सर्व महसूल मंडळामधील पर्जन्यमापक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
परभणीत 11 जूनला एका रात्रीतील 4 तासात तब्बल 186.2 मिमी पाऊस पडल्याचा दावा भारतीय हवामान खात्याने केला होता. ज्याची नोंद देखील आहे. मात्र याच दिवशी याच वेळी 85 मिमी पावसाची नोंद महसूल विभागाकडे झाली होती. याहून अधिक म्हणजे कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने तर 58.8 मिमीची नोंद केली होती. त्यामुळे नेमके खरे आकडे कुणाचे? हा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळं खरंच हा पाऊस एवढा पडलाय का? याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी समिती नेमली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)