एक्स्प्लोर
Advertisement
घरकाम करणाऱ्या गीता काळेंच व्हिजिटिंग कार्ड का होतंय व्हायरल?
काळे बावधन भागातल्या झोपडपट्टीमध्ये राहतात. आजूबाजूंच्या सोसायट्यांमधील घरांमध्ये काम करुन त्या संसार चालवतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमुळे त्यांना आता कामं मिळाली आहेत. ज्या घरांतलं काम सुटलं होतं ते कामही परत मिळाली
पुणे : सध्या पुण्यातलं एक व्हिजिटिंग कार्ड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय. घरकाम करणाऱ्या गीता काळे यांचं हे व्हिजिटिंग कार्ड असून, सध्या सोशल मीडीयावर चांगलचं धूमाकूळ घालतंय. कामाची गरज आहे म्हणून व्हिजिटींग कार्डचा पर्याय काळे यांनी निवडला. गंमत म्हणजे हे व्हिजिटिंग कार्ड एवढं व्हायरल झालं की, एका रात्रीत त्या प्रसिद्ध झाल्या. कामासाठी त्यांना मुंबई, पुणे नव्हे तर दिल्ली, हरियाणासह विविध राज्यांमधूनही फोन येत आहेत. त्या या फोनला एवढ्या वैतागल्या आहेत की, त्यांनी फोन बंद करुन ठेवला आहे.
काळे बावधन भागातल्या झोपडपट्टीमध्ये राहतात. आजूबाजूंच्या सोसायट्यांमधील घरांमध्ये काम करुन त्या संसार चालवतात. सकाळी 6 वाजल्यापासून घरकाम करायला बाहेर पडायचं आणि मग दुपारपर्यंत घरी येऊन घरातलं आवरायचं हे त्यांचं सर्वसामान्य आयुष्य आहे.
आता या व्हिजीटींग कार्डची गीता काळे यांना का गरज वाटली?
गीता काळे यांची काही घराची काम बंद झाली. यामुळे त्या चिंताग्रस्त झाल्या. बावधनमध्येच राहणाऱ्या धनश्री शिंदे यांच्याकडे त्या काम करतात. काही दिवसांपासून नाराज दिसणाऱ्या गीताताईंना कारण विचारलं असता काळे यांनी त्यांची अडचण बोलून दाखवली. तेव्हा अॅडव्हरटायजींग आणि ब्रॅंडिग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या धनश्री शिंदे यांना व्हिजीटींग कार्डची कल्पना सुचली. त्यांनी काळे यांना फक्त 100 व्हिजिटींग कार्ड ऑनलाइन ऑर्डर करून दिले. यामध्ये काळे यांनी मदत करावी एवढाच उद्देश होता.
विशेष म्हणजे हे 100 ही व्हिजिटींग कार्ड अजूनही काळे यांच्याजवळच आहेत. यातील एकही कार्ड त्यांना कुठे द्यायची गरज पडली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमुळे त्यांना आता कामं मिळाली आहेत. ज्या घरांतलं काम सुटलं होतं ते कामही परत मिळाले. हे व्हिजीटींग कार्ड व्हायरल व्हावं या उद्देशानं बिलकूल बनवलं नव्हतं असं धनश्री शिंदे सांगतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement