एक्स्प्लोर

लाल परीला पावसात पाण्याची गळती, छत्रीचा सहारा घेत प्रवाशांचा बसमधून प्रवास

 राज्यातील प्रवाशांना बाकी सुविधा नसतील तर हरकत नाही. परंतु, कमीत कमी न गळणाऱ्या बस तरी प्रवासासाठी उपलब्ध व्हाव्यात एवढीच माफक अपेक्षा प्रवासांच्या वतीने करण्यात आली आहे. 

Hingoli News: मराठवाड्यात सोमवारी सायंकाळी ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. रस्त्यावर पाणीच पाणी साठले असताना प्रवाशांना लाल परीतूनही (ST Bus) भिजतच येण्याची वेळ आली आहे. काल सायंकाळी परभणीहून वसमतच्या दिशेने येणाऱ्या लाल परी' ला गळती लागली आणि बसमध्ये प्रवाशांना छत्री उघडून बसण्याची वेळ आली. या प्रवासाचा व्हिडिओही आता समोर आला आहे.. त्यामुळे प्रवाशांना बाकी सुविधा नसतील तरी चालेल कमीत कमी न गळणाऱ्या बस तरी उपलब्ध करून द्याव्यात अशी माफक अपेक्षा प्रवासी करत आहेत.

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. मुसळधारांमुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. त्यातच कामासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी जाणाऱ्यांची दुहेरी तारांबळ उडाली. दरम्यान, अनेक जिल्ह्यात बसस्टँड पुर्नबांधणीसाठी पाडण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

लाल परीला लागली गळती

काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे लाल परीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे परभणीहून वसमतच्या दिशेने जाणाऱ्या बसला पावसामुळे गळती लागली. त्यामुळे अनेकांना बसमध्ये छत्रीचा आधार घ्यावा लागलाय.  अनेक प्रवासी बसमध्ये छत्री उघडून प्रवास करत होते. तर अनेकांचे अंग आणि कपडेसुध्दा पाण्याने पूर्ण भिजले होते. या अजब घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून प्रवाशांना बसमध्येही भिजत प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

किमान न गळणाऱ्या बस उपलब्ध कराव्यात, प्रवाशांची मागणी

 राज्यातील प्रवाशांना बाकी सुविधा नसतील तर हरकत नाही. परंतु, कमीत कमी न गळणाऱ्या बस तरी प्रवासासाठी उपलब्ध व्हाव्यात एवढीच माफक अपेक्षा प्रवासांच्या वतीने करण्यात आली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कायम

एसटी कर्मचाऱ्यांच्या (Maharashtra ST Employees) दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला आणि खर्चाला कमी पडणारी  रक्कम शासन देईल असे न्यायालयात कबूल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर परिपत्रक काढताना मात्र एक वर्षाच निधी देण्याचे परिपत्रक शासनाने प्रसारित केले. राज्य शासनाच्या चुकीच्या भुमिकेमुळे एसटीच्या 87 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर रखडले असून जून 2024 या महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटीकडून राज्य सरकारकडे निधी मागणीची फाईल पाठविण्यात आली होती. ती शासनाने रिजेक्ट केली असून आता कर्मचाऱ्यांना जून महिन्याचं वेतन मिळणार नाही हे नक्की झाले आहे.

हेही वाचा:

ST कर्मचऱ्यांना जून महिन्याचं वेतन मिळणार नाही, निधी मागणीची फाईल राज्य सरकारकडून रिजेक्ट

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
Malaika Arora : आई, तू असं डान्स करू शकत नाहीस; मलाईकाच्या डान्स स्टेप्सवर मुलगा अरहान काय म्हणाला?
आई, तू असं डान्स करू शकत नाहीस; मलाईकाच्या डान्स स्टेप्सवर मुलगा अरहान काय म्हणाला?
25 वर्षांच्या तरुणीच्या आतड्यात झपाट्यानं वाढली भलीमोठी गाठ, बघून डॉक्टरही चक्रावल्या ; तब्बल 15 सेमी गाठ काढण्यात यश
25 वर्षांच्या तरुणीच्या आतड्यात झपाट्यानं वाढली भलीमोठी गाठ, बघून डॉक्टरही चक्रावल्या ; तब्बल 15 सेमी गाठ काढण्यात यश
राखी सावंत अन् पती आदिल दुर्राणीमधील वाद मिटला, FIR रद्द; हायकोर्टाबाहेरुन अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया
राखी सावंत अन् पती आदिल दुर्राणीमधील वाद मिटला, FIR रद्द; हायकोर्टाबाहेरुन अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Fraud Alert: स्वस्त सोन्याच्या आमिषाने फसवणूक, महिलेला १ कोटींचा गंडा
Gold Fraud: 'बनावट सोनं देऊन कोट्यवधींची फसवणूक, पोलीस तपास सुरू
Beed Jail : बीड तुरुंगात धर्मांतराचा प्रयत्न? तक्रारीनंतर अधीक्षकांची उचलबांगडी
Gondia Guardian Minister : प्रफुल्ल पटेलांच्या टीकेचा परिणाम? गोंदियाचे पालकमंत्री बदलले
Hindutva Politics: राष्ट्रवादीत हिंदुत्वावरून वाद, संग्राम जगतापांना अजित पवारांची नोटीस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
पुणे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा रामभरोसे; दीड वर्षे होऊनही फायर सूट मिळेना, माहिती अधिकारातून आलं समोर
Malaika Arora : आई, तू असं डान्स करू शकत नाहीस; मलाईकाच्या डान्स स्टेप्सवर मुलगा अरहान काय म्हणाला?
आई, तू असं डान्स करू शकत नाहीस; मलाईकाच्या डान्स स्टेप्सवर मुलगा अरहान काय म्हणाला?
25 वर्षांच्या तरुणीच्या आतड्यात झपाट्यानं वाढली भलीमोठी गाठ, बघून डॉक्टरही चक्रावल्या ; तब्बल 15 सेमी गाठ काढण्यात यश
25 वर्षांच्या तरुणीच्या आतड्यात झपाट्यानं वाढली भलीमोठी गाठ, बघून डॉक्टरही चक्रावल्या ; तब्बल 15 सेमी गाठ काढण्यात यश
राखी सावंत अन् पती आदिल दुर्राणीमधील वाद मिटला, FIR रद्द; हायकोर्टाबाहेरुन अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया
राखी सावंत अन् पती आदिल दुर्राणीमधील वाद मिटला, FIR रद्द; हायकोर्टाबाहेरुन अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका पुढे ढकला; एकनाथ शिंदेंचा पलटवार, 'सन्नाटा'वरुन राज ठाकरेंनाही टोला
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका पुढे ढकला; एकनाथ शिंदेंचा पलटवार, 'सन्नाटा'वरुन राज ठाकरेंनाही टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2025 | बुधवार
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
Bihar election 2025: भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं; मैथिलीचं वय अन् इंस्टावर किती फोलोअर्स?
Maithili Thakur: भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं; मैथिलीचं वय अन् इंस्टावर किती फोलोअर्स?
Embed widget