एक्स्प्लोर
Gold Fraud: 'बनावट सोनं देऊन कोट्यवधींची फसवणूक, पोलीस तपास सुरू
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात बनावट सोनं देऊन झालेल्या फसवणुकीप्रकरणी अमोल नेरकर, मनोहर नेरकर, प्रेम गावंडे आणि नितेश महाले यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) येथे एका ज्वेलरी दुकानावर दरोडा पडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सुरुवातीला कमी डिस्काउंटमध्ये ओरिजिनल सोने दिले व नंतर विश्वास संपादन केल्यावर त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन त्यांना नकली सोने व चांदी देत, दीड वर्षात एक कोटी चौदा लाखाचा ऐवज दिला होता.' बुलढाणा पोलिसांनी आरोपींकडून ६१ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींनी महिलेकडून घेतलेल्या पैशातून खरे सोने विकत घेऊन ते खामगाव, अकोला येथील ज्वेलर्सकडे गहाण ठेवले होते. दुसऱ्या एका घटनेत, मुंबईतील घाटकोपरच्या अमृतनगर येथील दर्शन ज्वेलर्सवर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या हल्ल्यात दुकान मालक जखमी झाले असून, आरोपींनी हवेत गोळीबार करून दहशत पसरवली आणि फरार झाले. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांत तपास सुरू केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















