लाल परीला पावसात पाण्याची गळती, छत्रीचा सहारा घेत प्रवाशांचा बसमधून प्रवास
राज्यातील प्रवाशांना बाकी सुविधा नसतील तर हरकत नाही. परंतु, कमीत कमी न गळणाऱ्या बस तरी प्रवासासाठी उपलब्ध व्हाव्यात एवढीच माफक अपेक्षा प्रवासांच्या वतीने करण्यात आली आहे.
Hingoli News: मराठवाड्यात सोमवारी सायंकाळी ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. रस्त्यावर पाणीच पाणी साठले असताना प्रवाशांना लाल परीतूनही (ST Bus) भिजतच येण्याची वेळ आली आहे. काल सायंकाळी परभणीहून वसमतच्या दिशेने येणाऱ्या लाल परी' ला गळती लागली आणि बसमध्ये प्रवाशांना छत्री उघडून बसण्याची वेळ आली. या प्रवासाचा व्हिडिओही आता समोर आला आहे.. त्यामुळे प्रवाशांना बाकी सुविधा नसतील तरी चालेल कमीत कमी न गळणाऱ्या बस तरी उपलब्ध करून द्याव्यात अशी माफक अपेक्षा प्रवासी करत आहेत.
राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. मुसळधारांमुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. त्यातच कामासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी जाणाऱ्यांची दुहेरी तारांबळ उडाली. दरम्यान, अनेक जिल्ह्यात बसस्टँड पुर्नबांधणीसाठी पाडण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
लाल परीला लागली गळती
काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे लाल परीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे परभणीहून वसमतच्या दिशेने जाणाऱ्या बसला पावसामुळे गळती लागली. त्यामुळे अनेकांना बसमध्ये छत्रीचा आधार घ्यावा लागलाय. अनेक प्रवासी बसमध्ये छत्री उघडून प्रवास करत होते. तर अनेकांचे अंग आणि कपडेसुध्दा पाण्याने पूर्ण भिजले होते. या अजब घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून प्रवाशांना बसमध्येही भिजत प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
किमान न गळणाऱ्या बस उपलब्ध कराव्यात, प्रवाशांची मागणी
राज्यातील प्रवाशांना बाकी सुविधा नसतील तर हरकत नाही. परंतु, कमीत कमी न गळणाऱ्या बस तरी प्रवासासाठी उपलब्ध व्हाव्यात एवढीच माफक अपेक्षा प्रवासांच्या वतीने करण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कायम
एसटी कर्मचाऱ्यांच्या (Maharashtra ST Employees) दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला आणि खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल असे न्यायालयात कबूल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर परिपत्रक काढताना मात्र एक वर्षाच निधी देण्याचे परिपत्रक शासनाने प्रसारित केले. राज्य शासनाच्या चुकीच्या भुमिकेमुळे एसटीच्या 87 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर रखडले असून जून 2024 या महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटीकडून राज्य सरकारकडे निधी मागणीची फाईल पाठविण्यात आली होती. ती शासनाने रिजेक्ट केली असून आता कर्मचाऱ्यांना जून महिन्याचं वेतन मिळणार नाही हे नक्की झाले आहे.
हेही वाचा:
ST कर्मचऱ्यांना जून महिन्याचं वेतन मिळणार नाही, निधी मागणीची फाईल राज्य सरकारकडून रिजेक्ट