एक्स्प्लोर
उरणमध्ये 4 संशयित घुसल्याने दहशत, सर्च ऑपरेशन सुरुच
उरण : उरणमध्ये शिरलेल्या 4 संशयितांच्या शोध मोहिमेसाठी आता एनएसजीची टीम उरणमध्ये दाखल झाली आहे. शिवाय, अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी पोलिस महासंचालकांकडून सर्च ऑपरेशनचा अहवाल मागितला आहे.
वाचा : संवेदनशील उरण का महत्त्वाचं?
लष्कराचे गणवेश घातलेले चार संशयित उरणमध्ये फिरताना दिसल्याची माहिती शाळकरी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली. तर ते चार संशयित दहशतवादीही असू शकतात अशी शक्यता पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उरणला पोलीस छावणीचं स्वरूप आलं असून, गेल्या 15 तासांपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे.वाचा : संवेदनशील उरण का महत्त्वाचं?
हे संशयित समुद्रामार्गे मुंबई गाठण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे मच्छिमार बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच उरणमध्ये भारतीय नौदलाच्या विभागीय मुख्यालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement