एक्स्प्लोर
सलगच्या सुटट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब लागल्या आहे. सलग सुट्ट्या आल्याने कोणी पिकनिकसाठी तर कोणी गावाला जात असल्याने ट्रॅफिक जॅम झालं आहे. महिन्याचा दुसरा शनिवार, रविवारची सुट्टी आणि त्यातच सोमवारी स्वातंत्र्यदिनाची सुट्टी लागून आल्याने नोकरदारांना मोठा विकेण्ड मिळाला आहे. त्यामुळे या तीन दिवसात अनेकांनी पिकनिकचा प्लॅन केला आहे. परिणामी मुंबईबाहेर जाताना वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या काही किलोमीटरपर्यंत लांबच लाब रांगा लागल्या आहेत. तर पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर टोल नाक्याजवळही ट्रॅफिक जॅम आहे. इथे गाड्यांच्या जवळपास पाच किलोमीटर रांगा लागल्या आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या काही किलोमीटरपर्यंत लांबच लाब रांगा लागल्या आहेत. तर पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर टोल नाक्याजवळही ट्रॅफिक जॅम आहे. इथे गाड्यांच्या जवळपास पाच किलोमीटर रांगा लागल्या आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भारत
करमणूक























