एक्स्प्लोर
पावसाने कोल्हापूरला झोडपलं; पूरस्थिती गंभीर, कुठे वीजपुरवठा तर कुठे पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती अतिशय गंभीर झाली असून जिल्ह्यातील 107 बंधारे गेले पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 50 फूट 9 इंचांवर पोहोचली आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
कोल्हापूर : मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती अतिशय गंभीर झाली असून जिल्ह्यातील 107 बंधारे गेले पाण्याखाली
गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 50 फूट 9 इंचांवर पोहोचली आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. तर पाणी उपसा केंद्रातच पुराचं पाणी शिरल्यामुळे कोल्हापूर शहर आणि उपनगरांना आज पाणी पुरवठा होणार नाही.
कोल्हापूर शहराच्या नजीक पुणे-बंगळुरु हायवेवर पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी आल्याने महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूनेच सध्या वाहनांची ये-जा सुरु आहे. पुण्याहून कोल्हापूर-बेळगाव आणि बंगळुरुकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तर गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर पांगिरे फाटा इथला पूल कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी गारगोटीतून गडहिंग्लजकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.
कोल्हापुरात प्रमुख बंद अलेले रस्ते
1. विनस कॉर्नर
2. फोर्ड कॉर्नर
3. जयंती नदी
4. कलेकटर ऑफिस चौक
5. बंसत बार रोड पाटलाचा वाडा
6. बावडा- शिये
7. कोल्हापुर-पन्हाळा
8. कोल्हापुर-सांगली बायपास
9. पंचगंगा स्मशानभुमी-जुना बुधवार
10. कुंभार गल्ली
11.लक्ष्मीपुरी
12. शाहूपुरी
13. सिद्धार्थनगर
14. पंचगंगा तालीम
15. लक्षतीर्थ
16. मस्कुती तलाव
17. परीक पूल
बोटीच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरु
कोल्हापुरातील सर्व सखल भागांमध्ये पाणी साचलं असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बोटींच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने वयस्कर नागरिकांना बोटीच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे. याच भागामध्ये दोन ते तीन मोठी रुग्णालय आहेत. तिथेही पाणी शिरले असून स्थानिक नागरिक रुग्णांना बोटीच्या मदतीने बाहेर काढत आहेत.
खिद्रापूरमध्ये वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
खिद्रापूर इथे पूरस्थिती अतिशय बिकट झाली आहे. लोकांची स्थलांतर होण्यासाठी धावपळ सुरु आहे. 28 प्रवासी क्षमतेच्या नावेत 52 जण बसून वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास आहेत. नावेच्या एका फेरीसाठी दोन तास लागत आहेत. तर पुरातून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात फोन येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हतबल झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
राधानगरी धरणाचे आपत्कालीन गेट उघडले
कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे आपत्कालीन गेट उघडले आहेत. आपत्कालीन गेटमधून सात हजार क्युसेक तर सात स्वयंचलित दरवाज्यातून बारा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिणामी पाण्याच्या प्रवाहामुळे विद्युत खांब उद्ध्वस्त झाल्याने अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
याशिवाय मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील केकले परिसरातील जोतिबा डोंगराचा काही भाग खचला असून डोंगर परिसरात मोठ्या भेगा पडल्या आहेत.
महाजनादेश यात्रा थांबवा, कोल्हापूरला भेट द्या : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा थांबवून कोल्हापूरला भेट द्यावी. तिथली परिस्थिती गंभीर असून पाहणी करावी, असं आवाहन कोल्हापुरातील कागल मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
दरम्यान पुराच्या पाण्यात हुल्लजबाजी करणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी चांगला चोप दिला.मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा थांबवावी, कोल्हापूरला भेट द्यावी : आमदार हसन मुश्रीफ यांची मागणी @Marathi_Rash pic.twitter.com/XwGyLIgOpE
— ABP माझा (@abpmajhatv) August 6, 2019
#कोल्हापूर : पूर पाहायला गेलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांकडून चोप pic.twitter.com/yiwyi4aQag
— ABP माझा (@abpmajhatv) August 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement