एक्स्प्लोर
कोपर्डी बलात्कार प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु
अहमदनगर : कोपर्डी बलात्कार प्रकरणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात नियमित सुनावणीला सुरूवात झाली आहे. फिर्यादीसह 3 साक्षीदारांची तपासणी केली गेली आहे. पीडित मुलीचे वडील सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते.
कोपर्डी बलात्कारानंतर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मराठा मोर्चात जोर धरू लागली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला सुरू करू असं आश्वासनही दिलं होतं. त्यानुसार आजपासून नियमित सुनावणीला सुरूवात झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीत नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केली. त्यानंतर या घटनेविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली. याच घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखोंच्या संख्येत मराठा समाज रस्त्यावर उतरला. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि समजातील सर्वच स्तरातून होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement