Covid-19 : कोरोनाची लस सक्तीची नाही, मात्र दुसरा डोस विनंती करुन घ्यायला भाग पाडू : राजेश टोपे
Covid-19 : कोरोनाचा तिसरा व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका वाढल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारकडून लस घेण्याचं आवाहनदेखील केलं जात आहे.
Covid-19 : जगभरात आपली दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना (Corona) व्हायरसचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनने (Omicron) हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याचा एकमेव पर्याय म्हणून लसीकरण करण्याची विनंती राज्य सरकार वारंवार करत आहे. नुकतंच, राज्यात कोरोना लसीचे दोनही डोस घेणे आवश्यक असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमने-सामने आलं आहे. कोरोना लस सक्तीची नसल्याचं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. मात्र, राज्य सरकारची याबद्दलची सक्तीची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याच प्रश्नावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे की, राज्यात लसीकरण समाधानकारक असून, लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करू. तसेच, त्यांना लस घेण्यास भाग पाडू, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात लसीकरण प्रक्रिया यशस्वीपणे पार पडत असताना अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. याच प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Maneshkar) यांच्या प्रकृतीविषयीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. लता मंगेशकर यांच्याविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता, त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
राज्याची गेल्या २४ तासांची आकडेवारी
सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढ कमी, देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 33 हजार नवे कोरोनाबाधित
देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे तीन लाख 33 हजार 533 नवीन रुग्ण आढळले असून 525 जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढ कमी, देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 33 हजार नवे कोरोनाबाधित
- Omicron : ओमायक्रॉन करतो मेंदूवर हल्ला, स्मरणशक्तीवर होऊ शकतो परिणाम
- COVID 19 Omicron : एकाच व्यक्तीला दोनवेळा संक्रमित करू शकतो ओमायक्रॉन? संसर्ग टाळण्यासाठी काय कराल? जाणून घ्या..
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha