Health Department Paper Leak : पोलिसांच्या अहवालानंतरच आरोग्य विभागाच्या फेर परीक्षा, राजेश टोपे यांची माहिती
पेपर फुटीनंतर आरोग्य विभागाचा हा पेपर परत घेतला जाणार का? यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. परंतु,आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
जालना : आरोग्य भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी (Health Department Paper Leak) पुणे सायबर शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत 13 ते 14 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात राज्याच्या आरोग्य विभागाचा सहसंचालक डॉ. महेश बोटले याचाही समावेश आहे. दरम्यान, अनेक वर्षे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अशा प्रकरणांमुळे गळचेपी होत आहे. पेपर फुटीनंतर आरोग्य विभागाचा हा पेपर परत घेतला जाणार का? यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. परंतु,आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
"आरोग्य विभागाच्या फेर परीक्षेबाबत माहिती देताना राजेश टोपे म्हणाले, "आरोग्य विभागाच्या फेर परीक्षेचा निर्णय पोलीस तपासाच्या अहवालानंतरच घेण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून अहवालाची प्रतिक्षा आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास करून त्यांचा अहवाल दिल्यानंतर परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल."
आरोग्य विभागाच्या ड गटासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, परीक्षे दिवशीच पेपर फुटल्याची चर्चा गेटवर सुरू झाली आणि एकच गोंधळ उडाला. पेपर फुटीनंतर विद्यार्थी आणि पालकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. शिवाय ही परीक्षा परत घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलनेही झाली.
पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात आरोग्य विभागाचा सहसंचालक डॉ. महेश बोटले, आरोग्य विभागामध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेला प्रशांत बडगिरे याच्यासह खासगी क्लालचालकांना या रॅकेटप्रकरणी बेड्या ठोकल्या.
महत्वाच्या बातम्या