एक्स्प्लोर
ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांना 100-150 फेरीवाल्यांकडून जबर मारहाण

ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली आहे. संदीप माळवी यांच्या नाका-तोंडातून रक्त येईपर्यंत आणि अंगवरील कपडे फाडून 100 ते 150 जणांच्या जमावाने मारहाण केली. फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना हा प्रकार घडला. या मारहाणीत जखमी झालेले उपायुक्त संदीप माळवी यांना रिक्षावाला घेऊन जात असताना रिक्षावर देखील फेरीवाल्यांनी हल्ला केला आणि रिक्षाची पुढची काच फोडली. नौपाडा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, माळवी यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आणखी वाचा























